कारागृहातून कैद्याचा पयालनाचा प्रयत्न

By काशिराम म्हांबरे | Updated: June 7, 2023 20:56 IST2023-06-07T20:56:36+5:302023-06-07T20:56:46+5:30

प्राप्त माहितीनुसार, प्रदीप खर्को असे या कैद्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी ३.१०च्या सुमारास घडली.

Prisoner escape attempt from prison | कारागृहातून कैद्याचा पयालनाचा प्रयत्न

कारागृहातून कैद्याचा पयालनाचा प्रयत्न

म्हापसा : कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातून पलायनाच्या तयारीत असलेल्या एका कैद्याला तेथील सर्तक पोलिसांनी पकडले. हा कैदी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने त्याला बांबोळी येथे मानसोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रदीप खर्को असे या कैद्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी ३.१०च्या सुमारास घडली. या कैद्याला कारागृहातील पहिल्या मजल्यावर ठेवले होते. यावेळी अंतर्गत भिंत ओलांडून त्याने उडी मारली. हा प्रकार कारागृहच्या वॉच टॉवर्सवरील पोलिसांनी पाहिला व लगेच त्यांनी कारागृहाच्या इतर जेलगार्डना सर्तक केले असता त्यांनी या कैद्यास पकडले.

उडी मारतेवेळी त्याच्या गुडघ्याला किरकोळ जखम झाली.  दोन दिवसांपूर्वीच या कैद्याला मडगाव रेल्वे पोलिसांनी एका गुन्ह्यात पकडले होते. आणि त्याची रवानगी या कारागृहात केली. प्रथमदर्शनी हा कैदी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने त्याला कारागृह प्रशासनाने मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेमध्ये उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोलवाळ पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झालेला नव्हता.

Web Title: Prisoner escape attempt from prison

टॅग्स :goaगोवा