पणजीत मसाज पार्लरवर छापा
By Admin | Updated: July 6, 2014 00:46 IST2014-07-06T00:46:05+5:302014-07-06T00:46:49+5:30
पणजी : सांतिनेझ येथील लिझीस्रेस मसाज पार्लरवर पणजी पोलिसांनी छापा टाकून २ दलालांसह सहाजणांना अटक केली. या छाप्यामुळे ६ मुलींची सुटका करण्यात आली.

पणजीत मसाज पार्लरवर छापा
पणजी : सांतिनेझ येथील लिझीस्रेस मसाज पार्लरवर पणजी पोलिसांनी छापा टाकून २ दलालांसह सहाजणांना अटक केली. या छाप्यामुळे ६ मुलींची सुटका करण्यात आली. यातील चार मुली थायलंडच्या आहेत, तर दोन भारतीय आहेत.
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा ४ जण गिऱ्हाईक होते. चारही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गिऱ्हाईकांत एका माजी पंचसदस्याचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसेच मसाज पार्लर चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही राज्याबाहेरील असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणात आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता आहे.
या मसाज पार्लरमध्ये आयुर्वेदिक मसाजच्या नावाने वेश्या व्यवसाय चालू होता, अशा तक्रारी होत्या. शनिवारी रात्री ९.३०च्या सुमारास पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला. या पार्लरमध्ये काम करणाऱ्या सर्व मुलींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना मेरशी येथील सुरक्षागृहात पाठविल्याची माहिती प्रभुदेसाई यांनी दिली. या सर्व मुली बिगर गोमंतकीय आहेत. (प्रतिनिधी)