सुनील गर्ग, बॉस्को जॉर्ज यांना राष्ट्रपती पदक
By Admin | Updated: August 15, 2015 02:45 IST2015-08-15T02:42:46+5:302015-08-15T02:45:53+5:30
पणजी : पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. १९९२ साली आयपीएस सेवेत रुजू झालेले गर्ग

सुनील गर्ग, बॉस्को जॉर्ज यांना राष्ट्रपती पदक
पणजी : पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. १९९२ साली आयपीएस सेवेत रुजू झालेले गर्ग हे एक वर्षापूर्वी गोव्यात आयजीपी म्हणून आले. दिल्लीत त्यांची बेकायदा दारू विरुद्धची कारवाई गाजली. खंडणी व अपहरण प्रकरणातही त्यांनी दिल्लीत यशस्वी तपास केला. १ सप्टेंबर २०१४ रोजी गर्ग यांनी
गोव्यात ताबा घेतला. पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. ते सध्या लाचलुचपतविरोधी विभागात आहेत. २००७ साली त्यांना मुख्यमंत्री पोलीस पदक मिळाले होते. (प्रतिनिधी)