Goa: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ते २४ ऑगस्ट रोजी गोवा दौऱ्यावर
By किशोर कुबल | Updated: August 16, 2023 14:56 IST2023-08-16T14:53:51+5:302023-08-16T14:56:15+5:30
Draupadi Murmu: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू येत्या २२ ते २४ ऑगस्ट असे तीन दिवसांच्या गोवा दौय्रावर येत आहेत. २३ रोजी सकाळी त्या गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावतील व दुपारी ४ वाजता विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संबोधतील.

Goa: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ते २४ ऑगस्ट रोजी गोवा दौऱ्यावर
- किशोर कुबल
पणजी - राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू येत्या २२ ते २४ ऑगस्ट असे तीन दिवसांच्या गोवा दौय्रावर येत आहेत. २३ रोजी सकाळी त्या गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावतील व दुपारी ४ वाजता विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संबोधतील.
राष्ट्रपतींचे आगमन होत असल्याने प्रशासनातील आयएएस अधिकारी असलेले वेगवेगळ्या खात्यांचे सचिव, सर्व खातेप्रमुख तसेच ज्येष्ठ अधिकाय्रांना येत्या २४ पर्यंत रजा घेऊ नयेत असे निर्देश देणारे परिपत्रक कार्मिक खात्याने काढले आहे. गेल्या जुलैमध्ये देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी त्यांची निवड झाल्यानंतर प्रथमच त्या गोव्यात येत आहेत. निवडणुकीपूर्वी त्या गोव्यात आल्या होत्या. दरम्यान, राष्ट्रपतींच्या आगमनामुळे वरील काळात गोव्यातील प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध असतील त्यामुळे वाहने घेऊन गोवा फिरण्यासाठी येणाय्रा पर्यटकांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.