‘होम स्विट होम’ चित्रपटाचा प्रीमियर
By Admin | Updated: December 27, 2014 01:10 IST2014-12-27T01:10:12+5:302014-12-27T01:10:47+5:30
पणजी : ‘होम स्विट होम’ या चित्रपटाची संकल्पना उत्कृष्ट असून प्रत्येक गोमंतकीयांनी हा चित्रपट पाहावा असाच आहे. गेल्या दोन वर्षांत गोव्यात घरे विकणे, न्यायासाठी लढणे ही प्रकरणे सुरू आहेत.

‘होम स्विट होम’ चित्रपटाचा प्रीमियर
पणजी : ‘होम स्विट होम’ या चित्रपटाची संकल्पना उत्कृष्ट असून प्रत्येक गोमंतकीयांनी हा चित्रपट पाहावा असाच आहे. गेल्या दोन वर्षांत गोव्यात घरे विकणे, न्यायासाठी लढणे ही प्रकरणे सुरू आहेत. ज्यांना आपले क्रियाकर्म गोव्याच्या मातीत व्हावे असे वाटते, येथील भाषा, संस्कृती, पेहराव कायम राहावे असे वाटते, तोच माझ्या दृष्टीने खरा गोमंतकीय आहे. गोमंतकीय सुज्ञ आहेत. चित्रपटात मांडण्यात आलेल्या समस्या गोमंतकीयांच्या मर्माला हात घालणाऱ्या आहेत. मात्र, या समस्यांतून कशा प्रकारे मार्ग काढावा याचे ज्ञान गोमंतकीयांना आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.
गो गोवा गॉलीवुड प्रॉडक्शनचा कोकणी चित्रपट ‘होम स्विट होम’चा प्रमियर शो शुक्रवारी आयनॉक्स थिएटरात झाला. या वेळी पर्रीकर उपस्थित होते. सोबत गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक, भाजपचे पणजी मतदारसंघासाठीचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, चित्रपटाचे दिग्दर्शक स्वप्नील शेटकार, माधव गाड, संगीत दिग्दर्शक, गायक, कलाकार उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत चित्रपटाबाबत माहिती देताना दिग्दर्शक स्वप्नील शेटकर म्हणाले, गोमंतकीय आणि परप्रांतीय यांच्यामधील संघर्ष या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. प्ररप्रांतीयांना ‘घाटी’ ही उपमा देत गोमंतकीय सुशेगाद राहिले आणि आता प्ररप्रांतीयांनीच गोमंतकावर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. सर्वसाधरण नागरिकांना पोलीस खाते, सरकारी कार्यालयात कशा प्रकारची वागणूक दिली जाते, याचे चित्रणही दाखविण्यात आले असल्याचे शेटकर यांनी सांगितले.
राजदीप नायक म्हणाले, परप्रांतीयांच्या हातात गोवा जाण्याचे कारण गोमंतकीयच आहेत, याची जाणीव चित्रपट पाहिल्यावर होते. गोमंतकीयांनी आता जागे होण्याची आवश्यकता आहे. चित्रपट समस्या तर मांडतोच; शिवाय भविष्यात गोमंकीयांवर काय परिस्थिती ओढावेल, याचा इशाराही देतो.
पहिल्याच दिवशी पहिलाच शो गोव्यातील सातही चित्रपटगृहांत हाउसफुल्ल ठरला. चित्रपटाचा पुढील भागही प्रदर्शित करण्यात येईल, अशी माहिती शेटकर यांनी दिली. राज्य सरकारच्या मदतीमुळे चित्रपटासाठी चित्रपट कर माफ करण्यात आला; पण तांत्रिक बाजू हाताळताना चांगले चित्रपट प्रेक्षकांना द्यायचे असतील, तर राज्यात व्यावसायिक चित्रपट उद्योग स्थापन होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
या वेळी ध्वनीसंकलक शंकर सिंग, कॉद्रोस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक कॉद्रोस, सहदिग्दर्शक माधव गाड, कलाकार राजदीप नायक, सतीश गावस, आर्यन खेडेकर उपस्थित
होते. पुढील आठ दिवस हा चित्रपट साखळी, वास्को, माशेल,
पणजी, मडगाव, पेडणे, केपे येथे दाखविण्यात येणार आहे.