शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

प्रथमेश मावळींगकर बनला ‘मिस्टर सुप्राइंटरनॅशनल’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 4:16 PM

गोमंतकीय तरुणाची झेप : किताब जिंकणारा प्रथमेश आशियातून एकमेव भारतीय 

सचिन कोरडे : प्रथमेश मावळींगकर या राष्ट्रीय फुटबॉलपटूने ‘मिस्टर इंडिया’पर्यंत झेप घेतल्यानंतर आता फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्रातील सर्वांत मोठी स्पर्धा असलेल्या ‘मिस्टर सुप्राइंटरनॅशनल’चा किताब पटकाविण्याचा मान मिळविला.पोलंड येथील रविवारची रात्र भारतीय मॉडेल्स क्षेत्रासाठी सुवर्णमय ठरली. ‘मिस्टर सुप्राइंटरनॅशनल’ या स्पर्धेकडे बॉलीवूडच नव्हे, तर हॉलीवूडचेही लक्ष लागले होते. आशियामधून सुप्राइंटरनॅशनल ठरलेला प्रथमेश हा पहिलाच भारतीय आहे. शेवटच्या फेरीत विविध देशांचे २० मिस्टर्स सुप्रानॅशनल रांगेत होते.पोलंड येथे सुप्राइंटरनॅशनलचे हे तिसरे सत्र झाले. मिस्टर गटात जगभरातून ३८ स्पर्धकांची निवड झाली होती. थिवी (गोवा) येथील प्रथमेश हा राष्ट्रीय फुटबॉलपटू होता. त्याने २२ वर्षांखालील भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व केले. २५ जून २०१२ मध्ये प्रथमेशने भारताच्या २३ वर्षांखालील संघात पदार्पण केले होते. २०१३ मध्ये भारत-इराक या सामन्यात त्याला १४ व्या मिनिटालाच येलो कार्ड दाखवण्यात आले होते. त्याला जबरदस्त दुखापत झाली होती. यातून आपण सावरणार नाही, अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली आणि तेथूनच त्याने फुटबॉलला सोडचिठ्ठी दिली. त्याआधी, गोव्यातील आघाडीच्या धेंपो स्पोर्टर््स क्लबकडून प्रोफेशनल लीग स्पर्धेतही खेळला. फुटबॉलमधून फॅशनकडे वळत त्याने मिस इंडियाचा किताब पटकाविला होता. क्रिस्तिायानो रोनाल्डोचा तो मोठा चाहता आहे. त्यानंतर २०१५ मध्ये प्रथमेश हा ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’ या कार्यक्रमात झळकला. हा कार्यक्रम रणविजय सिंग व सनी लियोन हे होस्ट करतात. मुंबईत २०१७ मध्ये झालेली मिस इंडिया स्पर्धा जिंकण्याचा मान प्रथमेशने पटकाविला. या स्पर्धेत त्याने ‘गोवा-भारत’चे प्रतिनिधित्व केले होते. तेव्हापासून त्याने मॉडेल क्षेत्रात नाव कमावले. त्यानंतर तोे मिस्टर फोटाजेनिक अ‍ॅवॉर्डचा मानकरी ठरला. मिस्टर इंडिया सुप्रानॅशनल स्पर्धा जिंकत त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडून पात्रता मिळवली होती. २०१८ मध्ये त्याने बेस्ट बॉडी अ‍ॅवॉर्ड आणि सुप्राइंटरनॅशनल किताब मिळवला आहे.पुयेत्रो रिको या देशाची वालेरिया वास्क्वेझ ही मिसेस सुप्राइंटरनॅशनल ठरली.

लाजू नका, तुमच्यातील क्षमता सिद्ध करा...प्रथमेश याने आॅगस्ट महिन्यात स्पर्धेला जाण्यापूर्वी ‘लोकमत’शी संवाद साधला होता. तेव्हा त्याने गोमंतकीय चाहत्यांना एक संदेश दिला होता. यात तो म्हणाला की, प्रत्येकात काही ना काही कौशल्य असते. ते बाहेर आणत त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करा. मॉडेल्स क्षेत्रात गोमंतकीय सहसा उतरत नाही. ते लाजतात. लाजू नका. या क्षेत्रात खूप संधी आहेत. तुमच्यातील क्षमता सिद्ध करा. मी गेल्या सहा महिन्यांपासून या किताबासाठी मेहनत घेत आहे. त्याचे चीज झाले. बॉडी, फिटनेस, लुक्स, बोलण्याची शैली आणि स्वत:ला सादर करण्याचे कौशल्य यावर खूप मेहनत घ्यावी लागते, असे तो म्हणाला.

टॅग्स :goaगोवाFootballफुटबॉल