Pooja Naik will be candidate of Goa forward for Margao municipal chairperson. | मडगावच्या नवीन नगराध्यक्षपदी पूजा नाईक यांची करणार नियुक्ती

मडगावच्या नवीन नगराध्यक्षपदी पूजा नाईक यांची करणार नियुक्ती

मडगाव:  मडगाव पालिकेतील सत्ता बदलासाठी एकत्र आलेल्या काँग्रेस व भाजपात काही प्रमाणात फूट पडण्याचे संकेत मिळत असतानाच गोवा फॉरवर्डतर्फे उमेदवार म्हणून पूजा नाईक यांचे नाव पुढे केले जाईल अशी घोषणा बुधवारी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली. आम्ही बहुजन समाजाचा उमेदवार नगराध्यक्षपदी बसवू पहातो. विरोधकांकडे असा कोणी बहुजन समाजाचा उमेदवार असल्यास त्यांनी त्याचे नाव पुढे करावे. तसे केल्यास त्या उमेदवाराबद्धलही विचार करता येणो शक्य आहे असे ते म्हणाले.

बबिता प्रभुदेसाई यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे.  येत्या शुक्रवारपर्यत जर त्यांनी तो मागे घेतला नाही तर तो मंजुर होणार, अशा परिस्थितीत नवा नगराध्यक्ष कोण असावा याबाबत विरोधकांनी अजुनही निर्णय घेतलेला नाही. या पाश्र्र्वभूमीवर मंगळवारी सरदेसाई यांनी पूजा नाईक यांचे नाव जाहीर करुन एकाप्रकारे विरोधकांची हवा काढून घेतली आहे.

सरदेसाई म्हणाले, आमच्याकडे 11 नगरसेवक आहेत. मडगावात बहुजन समाजाच्या नगराध्यक्ष व्हाव्या असे कुणाला वाटते त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रभुदेसाई यांना हटविल्यानंतर भाजपाच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा घेत काँग्रेसच्या डॉरिस टेक्सेरा यांनी या पदावर विराजमान होण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. असे जरी असले तरी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी अजुनही काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक बोलावलेली नाही.  

दुस:याबाजूने काँग्रेस व भाजपा कुठल्याही परिस्थितीत एक होणार नाहीत अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते शर्मद रायतूरकर यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात भाजपाच्या एका नगरसेवकाला विचारले असता, अजुनही आम्ही आमची रणनिती ठरवलेली नाही असे सांगितले. तर अन्य एका नगरसेवकाने जर पुजा नाईक नगराध्यक्ष होत असतील तर आमचा त्याला विरोध नसेल असे स्पष्ट केले.

नाईक यांना उमेदवार म्हणून पुढे आणण्याचे कारण सांगताना सरदेसाई म्हणाले, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष सारस्वत समाजाचे असून नगराध्यक्षही याच समाजाच्या होत्या त्याचमुळे आम्ही त्यात बदल करुन बहुजन समाजाला पद देऊ पहात आहेत. त्यासाठी आम्हाला समविचारी नगरसेवकांचे सहाय्य पाहिजे.

मडगावात सध्या जो जॅक सिकैरा यांचा पुतळा उभारण्यावरुन जो वाद निर्माण झाला आहे त्याबद्दल बोलताना सरदेसाई म्हणाले, आधी काही लोक बोडर्य़ातील सेंट ज्योकीम चौकाला विरोध करत होते. आता त्याच प्रवृत्तीचे लोक डॉ. सिकैरा यांना विरोध करत आहेत. असे जरी असले तरी आमच्या धोरणात आम्ही बदल करणार नाहीत. जो ठराव घेतला आहे तो बदलला जाणार नाही. या ठरावाच्या प्रक्रियेविषयी सध्या आक्षेप घेतले जातात. प्रक्रिया योग्य की नाही हे पहाण्याचे काम कारकुनाचे असते, राजकारण्यांचे नव्हे असे ते म्हणाले. आपण सत्तेवर आल्यास जॅक सिकैरांचा पुतळा विधानसभेत उभारु असे आता काँग्रेस म्हणत आहे. पण ते सत्तेत असताना त्यांच्याकडे हे काम का झाले नाही असा सवालही त्यांनी केला.

मडगाव पालिकेत भाजपा व काँग्रेस नगरसेवक एकत्र आले आहेत. सोयीसाठी ही जवळीक असावी असे सांगताना, हाच फॉम्युला काँग्रेसने महाराष्ट्रातही वापरला पाहिजे होता असा उपारोधात्मक टोलाही त्यांनी हाणला. मडगाव मॉर्डन बनवा. तेथे सिग्नल्स बसवा असेही ते म्हणाले. मडगाव पालिकेच्या सदया जे काही चालू आहे ते बघता आपण नेहमीच फातोडर्यासाठी स्वतंत्र नगरपालिकेची का मागणी करीत होतो ते सर्वाना कळाले असावे असेही ते म्हणाले.  

Web Title: Pooja Naik will be candidate of Goa forward for Margao municipal chairperson.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.