खाण घोटाळा प्रकरणातील संशयित इम्रान खानला २५ लाख रुपये काढण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 22:02 IST2018-01-22T22:02:25+5:302018-01-22T22:02:32+5:30
खाण घोटाळा प्रकरणातील संशयित ट्रेडर इम्रान खान याला त्याच्या गोठविण्यात आलेल्या ९० कोटी रुपयांच्या बँक ठेवीतून २५ लाख रुपये काढण्यासाठी पणजी विषेश न्यायालयाने परवानगी दिली आहे.

खाण घोटाळा प्रकरणातील संशयित इम्रान खानला २५ लाख रुपये काढण्याची परवानगी
पणजी: खाण घोटाळा प्रकरणातील संशयित ट्रेडर इम्रान खान याला त्याच्या गोठविण्यात आलेल्या ९० कोटी रुपयांच्या बँक ठेवीतून २५ लाख रुपये काढण्यासाठी पणजी विषेश न्यायालयाने परवानगी दिली आहे.
इम्रान खान याला बेकायदा खाण प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या ९० कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठविण्यात आल्या होत्या. या ठेवी काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला होता. परंतु एसआयटीकडून त्याला आक्षेप घेण्यात आला होता. इम्रान खान याने पर्यावरण नियमाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन केले होते. तसेच लिजधारकाच्या कुटुंबियाकडून बेकायदेशीरपणे पावर आॅफ एटोर्नी घेऊन हे उत्खनन करण्यात आले होते. त्याने सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला असल्यामुळे हे पैसे जप्त करण्यात आल्याचे एसआयटीकडून न्यायालयात सांगण्यात आले. न्यायालयाकडून यावर निवाडा देताना इम्रानला फक्त २५ लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी दिली. त्यासाठी एसआयटीने इम्रान खानला सहकार्य करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
दरम्यान गोठविण्यात आलेल्या रक्कमेपेक्षा इम्रानने सरकारी तिजोरीला केलेले नुकसान अधिक असल्याचे स्पष्ट करून त्याची भरपाई करून घेण्यासाठी एसआयटीने खाण खात्याला पत्र लिहिले होते. मात्र अद्याप त्यावर कोणताही कारवाई करण्यात आली नाही.