शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
2
दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका; राज ठाकरेंची खा. नरेश म्हस्केंना सूचना
3
‘’अरविंद केजरीवालजी, आम्हाला १ हजार रुपये द्या’’, महिलांचं दिल्ली सरकारविरोधात आंदोलन
4
बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक?; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांकडे मोर्चेबांधणी
5
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मुस्लीम मंत्री का नाही? संजय राऊतांनी सांगितली 'थिएरी'
6
'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer
7
दादरचा हा फूटपाथ पालिकेनं नव्हे, तर चोरांनी खोदला! लाखो रुपये किमतीची MTNL केबल लंपास
8
Shares to Buy : शेअर बाजाराच्या चढ-उतारादरम्यान ब्रोकरेज SBI सह 'या' शेअर्सवर बुलिश, दिलं 'बाय' रेटिंग
9
Smita Shewale : Video - "मी जगूच नाही शकणार..."; 'मुरांबा'मधील 'जान्हवी'ला निरोप देताना 'रमा' झाली भावूक
10
"भटकत्या आत्म्याचा त्रास काहीच दिवस, त्यानंतर..."; शरद पवारांना मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर
11
जंगल मे भौकाल! Mirzapur 3 चा टीझर आऊट, रिलीज डेटही समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
12
Tejashwi Yadav : "नरेंद्र मोदी यावेळी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"; तेजस्वी यादव यांचा घणाघात
13
Fact Check : भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोदी सर्व युजर्सना देताहेत मोफत रिचार्ज?, हे आहे 'सत्य'
14
२०१४ मध्ये भूतान, २०१९ मध्ये मालदीव... तिसऱ्या कार्यकाळात 'या' देशापासून सुरू होणार PM मोदींचा विदेश दौरा 
15
शीख समुदायाबद्दल अपशब्द; हरभजन सिंगचा संताप, अखेर पाकिस्तानी खेळाडूचा माफीनामा
16
"लाज वाटू दे, तुमच्या आई-बहिणींची अब्रू..."; हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटरला सुनावले
17
खातेवाटप जाहीर होताच मंत्री ॲक्शन मोडमध्ये, आज कोणते मंत्री पदभार स्वीकारणार? पाहा संपूर्ण माहिती...
18
खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"
19
Success Story: अगणित संपत्तीचे मालक, देतात 'रॉयल' एक्सपिरिअन्स; उभं केलंय १ लाख कोटींचं साम्राज्य
20
Railway Stock Price: अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा रेल्वे मंत्रालय; RVNL सह 'या' शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल

लोक काँग्रेससोबतच

By admin | Published: May 25, 2016 2:48 AM

पणजी : राज्यातील लोकांनी सत्ताधारी भाजपचा या वेळी पराभव करावा, असे ठरवूनच टाकले आहे. लोक काँग्रेससोबतच आहेत;

पणजी : राज्यातील लोकांनी सत्ताधारी भाजपचा या वेळी पराभव करावा, असे ठरवूनच टाकले आहे. लोक काँग्रेससोबतच आहेत; कारण सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन केवळ काँग्रेसच धर्मनिरपेक्ष राजवट देऊ शकते, हे लोकांना ठाऊक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अ‍ॅड. यतीश नायक यांनी व्यक्त केली. आपचे नेते केजरीवाल यांच्या सभेस मोठी गर्दी झाल्याविषयी पत्रकारांनी काँग्रेस हाउसमध्ये यतीश नायक यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, आपण कुठल्याच पक्षाचे नाव घेत नाही व त्याबाबत प्रतिक्रियाही देत नाही; पण एवढेच सांगतो की, गोव्यातील जनता काँग्रेससोबत आहे. भाजपच्या राजवटीला गोमंतकीय कंटाळले आहेत. या सरकारने गोव्यावर मोठ्या कर्जांचा डोंगर ठेवलेला आहे. धर्र्मनिरपेक्ष शक्तींचे हात बळकट करायला हवे, असे लोकांनी ठरवून टाकले असल्याची माहिती आम्हाला लोकांमध्ये रोज फिरताना मिळते. यतीश नायक म्हणाले की, काँग्रेसने नुकताच पणजीत मशाल मोर्चा काढला. हजारो लोक त्या मोर्चात सहभागी झाले होते. यावरून स्थिती कळून येते. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एदुआर्द फालेरो यांनी विधानसभेत व संसदेत यापूर्वीच्या काळात केलेल्या सर्व भाषणांचे एकत्रित पुस्तक तयार करण्यात आले असून या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ३ रोजी सायंकाळी चार वाजता गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये केले जाईल व त्या वेळी दिग्विजय सिंग यांची प्रमुख उपस्थिती असेल. (प्रतिनिधी)