हणजूण परिसरातील शापोरा येथे नशेत ठोकरल्याने पादचारी जखमी
By काशिराम म्हांबरे | Updated: December 16, 2023 16:18 IST2023-12-16T16:18:08+5:302023-12-16T16:18:19+5:30
अपघातावेळी पूण्यातील हा कारचालक नशेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हणजूण परिसरातील शापोरा येथे नशेत ठोकरल्याने पादचारी जखमी
म्हापसा: हणजूण परिसरातील शापोरा येथे आज सकाळी झालेल्या अपघातात चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावल्यानेअपघात घडला आहे. कार अपघातग्रस्त होण्यापूर्वी एका पादचाऱ्याला धडकली. त्यात पादचारी जखमी झाला आहे. अपघातावेळी पूण्यातील हा कारचालक नशेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्यानंतर ती पादचाऱ्यावर धडकली व नंतर उलटली. पंकज शर्माअसे त्या चालकाचे नाव आहे. तो एमएच - १२ एल २३०३ या क्रमांकाच्या गाडीतून शापोरा येथील रस्त्यावरून जात असताना हा अपघात घडला.
अपघातानंतर पादचाऱ्याला तातडीने बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चालक शर्मा याला किरकोळ दुखापत झाली आहे. पादचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याचे देसाई म्हणाले. दरम्यान पंकज शर्मा याची अल्कोहोलीक चाचणी सुद्धा घेण्यात आली आहे. त्याचा अहवाल प्रतिक्षेत आहे. पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.