शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

गोव्यात घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी; काँग्रेसचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 14:57 IST

मगोप आणि गोवा फॉरवर्डला सरकारची साथ सोडण्याचं आवाहन

पणजी: राज्यातील प्रशासन कोलमडले आहे. गेल्या सहा महिन्यात मंत्रिमंडळाची एकही बैठक मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊ शकलेली नाही. खाणबंदीसारखा गंभीर विषय सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर मगोप आणि गोवा फॉरवर्ड या घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी,  असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यतिश नायक यांनी केली आहे.पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री पर्रिकर हे आजारी आहेत. त्यांना अमेरिकेपर्यंत उपचारासाठी नेले. परंतु नेमका कोणता आजार त्यांना जडला आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सरकारने अद्याप जनतेसाठी जाहीर केलेली नाही. त्यांच्या आजाराबद्दल लपवाछपवी चालली आहे. राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. जनतेचे कोणतेही प्रश्न सुटू शकलेले नाहीत. बंद खाणी पूर्ववत कधी सुरू होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. बेकारीची समस्या उग्र स्वरूप धारण करून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घटक पक्षांनी जनतेचे हित पाहून सद्सद्विवेक बुद्धीने सरकारपासून फारकत घेण्याची गरज आहे.नायक पुढे म्हणाले की, काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अजूनही सक्षम आहे. आमचे दोन आमदार भाजपने पळवले असले, तरी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ आहे, असा दावा करीत ते म्हणाले की, 'राज्यपालांना पाच वेळा निवेदने दिली. राष्ट्रपतींनाही निवेदन पाठवले. परंतु अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.' भाजपकडे आज नेता नाही, तत्त्वे नाहीत आणि कोणते धोरणही नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे, असा दावा करताना  नायक म्हणाले की, सरकार कर्जावर कर्जे काढत आहे. अलीकडेच १०० कोटी रुपयांचे कर्जरोखे बाजारात विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत. आणखी किती कर्जे काढणार, असा सवाल त्यांनी सरकारला केला.गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री आजारी आहेत. त्यांच्या आजारपणामुळे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन दिवसात गुंडाळण्यात आले. त्यांच्या आजाराबद्दल भाजपकडूनही लपवाछपवी चालली आहे. सरकार नेतृत्वहीन बनले आहे, असा आरोप नायक यांनी केला. पत्रकार परिषदेस पक्षाचे पदाधिकारी विजय पै उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा