खनिज उत्खनन मर्यादेवर पर्रीकर यांची नाराजी

By Admin | Updated: June 30, 2014 02:11 IST2014-06-30T02:07:48+5:302014-06-30T02:11:13+5:30

--

Parrikar's resignation over mining excavation | खनिज उत्खनन मर्यादेवर पर्रीकर यांची नाराजी

खनिज उत्खनन मर्यादेवर पर्रीकर यांची नाराजी

पणजी : खनिज उत्खननावर घातलेल्या मर्यादेला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जोरदार हरकत घेतली आहे. आंतरपिढी समानतेचा नारा ही आजकाल केवळ फॅशन बनली आहे, असेही ते म्हणाले. केवळ गोव्यासाठीच असे निर्बंध का, असा सवाल करताना त्यांनी सुप्रीम कोर्टाने घातलेल्या वार्षिक २० दशलक्ष टन उत्खनन मर्यादेवरही नाराजी व्यक्त केली.
शनिवारी गोवा चेंबर आॅफ कॉमर्सच्या आमसभेत ते बोलत होते. आंतरपिढी समानता ही संकल्पना निसर्ग आणि पर्यावरणाचे सद्य आणि भावी पिढीसाठीही जतन करण्यासाठी आहे, असे ते म्हणाले. केवळ उत्खनन मर्यादेवरच विचार न करता खनिज वापराच्या नियंत्रणावरही विचार झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
पर्रीकर या वेळी पर्यावरणप्रेमींवरही घसरले. जे कोळसा, वाळू किंवा खनिज खाणींना विरोध करीत आहेत त्यांना एअर कंडिशन रुममध्ये बसण्याचा
अधिकार नाही, असेही पर्रीकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकांनी त्यांच्या कारकिर्दीच्या प्रारंभीच चमत्काराची अपेक्षा करू नये, असेही पर्रीकर म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Parrikar's resignation over mining excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.