पर्रीकरांच्या कारकिर्दीत पणजी ‘आयसीयू’त!
By Admin | Updated: February 13, 2015 01:14 IST2015-02-13T01:11:30+5:302015-02-13T01:14:15+5:30
पणजी : विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीचे प्रतिनिधित्व केलेल्या काळात पणजीचा विकास खुंटला. पणजीत

पर्रीकरांच्या कारकिर्दीत पणजी ‘आयसीयू’त!
पणजी : विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीचे प्रतिनिधित्व केलेल्या काळात पणजीचा विकास खुंटला. पणजीत समस्यांचे डोंगर रचून या मतदारसंघाला ‘आयसीयू’त पोहोचविले, अशी प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केली.
पणजीत गेल्या २० वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. असे असतानाही पणजीकरांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व स्नानगृहे देण्यात भाजपला अपयश आले आहे. पणजीत समस्यांचे मात्र डोंगर रचले आहेत. खुली गटारे, खंडित वीज, उखडलेले रस्ते, कचऱ्याच्या राशी आणि दुर्गंधी, वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगच्या समस्येने पणजी ग्रासली आहे. पक्षाशी द्रोह करणाऱ्या कॉँग्रेस नेत्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा फालेरो यांनी दिला आहे.