शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गोवा बनतोय गुन्हेगारांचे नंदनवन

By admin | Updated: June 16, 2014 02:01 IST

गोवा बनतोय गुन्हेगारांचे नंदनवन

सूरज पवार-मडगाव  : गुन्हेगारांसाठी गोवा नंदनवन बनत आहे. दोन दिवसांपूर्वी मडगाव पोलीस स्थानकाच्या एलआयबी पोलीस पथकाने मूळ मणिपूर येथील दोघांना गजाआड केले. नोकरीच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या अरबाज खान व रुफियत अली या दोघांनी चोरीचा मार्ग पत्करला व शेवटी त्यांना तरुंगाची हवा खावी लागली. सुशेगाद गोवा या गुन्हेगारांसाठी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असाच झाला आहे. ८0 च्या दशकात पर्वरी येथील ओ कोकेरो या हॉटेलात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्या वेळी प्रथमच गोवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी क्षेत्रात चमकला होता. त्यानंतर मडगावात फ्रेडी पिट्स प्रकरण घडले. बाल लैंगिक अत्याचाराच्या या प्रकरणाने गोवा ढवळून निघाला होता. त्यानंतर मांडवी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, गेल्या काही वर्षांत या राज्यात बोकाळलेली गुन्हेगारी बघता गोवा आता गुन्हेगारी क्षेत्रातही पिछाडीवर राहिले नाही हे विदारक सत्य आता सुशेगाद गोवेकरही पचवू लागला आहे. दोन वर्षांपूर्वी कासावली येथे नक्षलवाद्यांना पोलिसांनी गजाआड केले होते. भाड्याने घर घेऊन ही मंडळी गोव्यात बिनधास्त राहात होती. गोव्यात भाडेकरू ठेवल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. मंगला एक्सप्रेसमध्ये बॉम्ब साहित्य घेऊन आलेला काश्मिरी आंतकवादी तारीक अहमद बाटलू याला मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात काही वर्षांपूर्वी अटक केली होती. पोलीस तपासात बाटलू हा शिरवडे येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहात होता, असे आढळून आले होते. हेडली हा आंतकवादीही गोव्यात येऊन रेकी करून गेल्याचे सिध्द झाले होते. तर इंडियन मुजाहिदीनचा कुविख्यात आतंकवादी यासीन भटकळ हाही गोव्यात वास्तव्यास होता, असे पोलीस तपासात आढळून आले होते. गेल्या महिन्यात कामराभाट येथे एका घरात गावठी बॉम्बचा स्फोट होऊन पपलू मलगुंड हा ठार झाला होता. मयताला भाडेकरू म्हणून ठेवताना घरमालकिणीने कुठलीही खबरदारी घेतली नव्हती, असे पोलीस तपासात आढळून आले आहे. गोव्यासाठी आता गुन्हेगारी नवीन राहिली नाही. दिवसागणिक येथे खून, दरोडे प्रकरणांची नोंद होत आहे. ४ जून रोजी केरी-सत्तरी येथील सावित्री झोरे या विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून तिच्या नवऱ्यानेच खून केला. या प्रकरणी संशयित सध्या पोलीस कोठडीत आहे. (प्रतिनिधी)