आता लवकरच एफआयआरही ‘रिअल टाईम’वर, गोव्यातील पोलीस स्थानके होणार पेपरलेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 08:38 PM2019-06-10T20:38:35+5:302019-06-10T20:38:52+5:30

पेपरलेस पोलीस स्थानक ही संकल्पना आता तब्बल चार वर्षाच्या विलंबानंतर गोव्यातही लागू होण्याच्या मार्गावर असून त्याचाच एक भाग म्हणजे आतार्पयत पोलीस मुव्हमेंट रजिस्टर ज्याला नेहमीच्या भाषेत पोलीस डायरी असे म्हटले जाते ती डायरी आता ऑनलाईन झाली आहे.

paperless police station in Goa | आता लवकरच एफआयआरही ‘रिअल टाईम’वर, गोव्यातील पोलीस स्थानके होणार पेपरलेस

आता लवकरच एफआयआरही ‘रिअल टाईम’वर, गोव्यातील पोलीस स्थानके होणार पेपरलेस

googlenewsNext

 - सुशांत कुंकळयेकर 

मडगाव - पेपरलेस पोलीस स्थानक ही संकल्पना आता तब्बल चार वर्षाच्या विलंबानंतर गोव्यातही लागू होण्याच्या मार्गावर असून त्याचाच एक भाग म्हणजे आतार्पयत पोलीस मुव्हमेंट रजिस्टर ज्याला नेहमीच्या भाषेत पोलीस डायरी असे म्हटले जाते ती डायरी आता ऑनलाईन झाली आहे. येत्या काही महिन्यात इतर कागदपत्रेही ऑनलाईन होणार असून लोकांनी दाखल केलेल्या एफआयआर आणि गुन्हेगारावर दाखल करण्यात आलेली आरोपपत्रेही ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.

क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक पंकजकुमार सिंग यांनी याबद्दल बोलताना, या पद्धतीमुळे पूर्ण पोलीस प्रशासनात पारदर्शकता येण्याबरोबरच लिखापढी कमी झाल्यामुळे वेळही वाचेल आणि या वाचलेल्या वेळाचा इतर कामासाठी उपयोग होऊ शकेल असे मत व्यक्त केले.

क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्किग सिस्टम (सीसीटीईएनएस) या योजनेखाली जूनच्या 1  तारखेपासून पोलीस डायरी रियल टाईम जनरल डायरी बनली आहे. सोप्या अर्थात सांगायचे झाल्यास ज्यावेळी या डायरीची नोंद केली जाते ती वेळ या यंत्रणोत आपोआप नोंद होते. एवढेच नव्हे तर या नोंदी कुणी केल्या त्याचीही नोंद होते. यामुळे यापुढे पोलीस डायरीत फेरफार हा प्रकार कमी होणार आहे. त्यामुळे यापूर्वी हाती लिहिल्या जाणा:या डाय:यात फेरफार करुन जसा दुरुपयोग केला जायचा तो बंद होणार आहे. एवढेच नव्हे तर नोंद करणा:यांच्या नावाचीही नोंद आता होणार असल्याने मुद्दामहून डायरीत फेरफार करण्यास कुणी धजावणारही नाही.

याबद्दल बोलताना सिंग म्हणाले, ही यंत्रणा वापरण्यासाठी प्रत्येकाला युजर आयडी आणि पासवर्ड दिला असल्यामुळे दुसरा कुणी यात फेरफार करु शकणार नाही. एवढेच नव्हे तर नेमक्या कोणत्यावेळी ही डायरी लिहिली गेली याचीही नोंद होणार असून सर्व पोलीस वरिष्ठांना आता ती पहाता येणो शक्य असल्याने पोलीस प्रशासनातील शिस्तही वाढणार आहे.एवढेच नव्हे तर न्यायालयातही या डायरीचा पुरावा म्हणून वापर करता येणो शक्य आहे.

सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही पद्धती वाळपई, कुळे, वास्को रेल्वे पोलीस आणि दाबोळी विमानतळ पोलीस या चार पोलीस स्थानकावर राबविली गेली होती. त्यानंतर आता गोव्यातील 43ही पोलीस स्थानकात ही पद्धती सुरु झाली आहे. लवकरच पोलीस स्थानकात नोंद होणा:या एफआयआर्स, गुन्हेगारावर दाखल केली जाणारी आरोपपत्रे अशा सर्व बाबी रियल टाईम यंत्रणोखाली आणल्या जाणार आहेत. यासाठी आणखी चार-पाच महिने लागण्याची शक्यता आहे. मात्र ती पद्धती सुरु झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीने कधी एफआयआर दिली याची अचूक नोंद उपलब्ध होणार आहे. याबद्दल अधिक माहिती देताना सिंग म्हणाले, आताही आम्ही एफआयआर आणि इतर मजकूर ऑनलाईनवर लोड करतो. मात्र त्यापूर्वी ही सर्व प्रक्रिया पारंपारिक पद्धतीने म्हणजे टाईप करुन पार पाडली जाते. नवीन यंत्रणोत ती परस्पर ऑनलाईनवर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे सर्व पोलीस स्थानके ख:या अर्थाने पेपरलेस बनतील आणि त्यामुळे पोलीस कर्मचा:यांचे श्रमही ब:याच प्रमाणात कमी होणार आहेत.


 

Web Title: paperless police station in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.