पणजी पोलिस ठाणे हल्ला प्रकरण : कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीसाठी मोन्सेरा यांचा न्यायालयाकडे अर्ज
By सूरज.नाईकपवार | Updated: October 6, 2023 18:45 IST2023-10-06T18:45:16+5:302023-10-06T18:45:33+5:30
पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला...

पणजी पोलिस ठाणे हल्ला प्रकरण : कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीसाठी मोन्सेरा यांचा न्यायालयाकडे अर्ज
मडगाव - गोव्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी राज्याची राजधानी पणजी पोलिस ठाणे हल्ला प्रकरणात आपल्याला कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा दयावी असा अर्ज आपल्या वकिलाकरवी मडगावच्या दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाच्यान्यायालयात केला आहे. येत्या शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
आज शुक्रवारी पणजी पोलिस ठाणे हल्ला प्रकरणाच्या सुनावणीस मोन्सेरात हे उपस्थित राहिले.दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी चालू आहे. यापुर्वी न्यायालयाने बाबुश मोन्सेरात यांना ३० सप्टेंबर पर्यंत या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात अनुपस्थित राहण्याची मुभा दिली होती.
आज या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मंत्री मोन्सेरात यांच्या पत्नी व ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात या गैरहजर होत्या.जेनिफर यांनीही यापुर्वी या खटल्यात आपल्याला कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली होती. संशयितांचे वकील उपस्थित होते.
सदया या खटल्यात उपअधिक्षक सुदेश नाईक यांची उलटतपासणी चालू आहे. काल शुक्रवारी त्यांची अशंत उलटतपासणी झाली. पुढील सुनावणीच्या वेळीही त्यांची ही उलटतपासणी चालू राहिल.