फोंडा पोटनिवडणुकीचा दीड कोटींचा खर्च वाया; हायकोर्टाच्या निवाड्यामुळे झाली होती रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 08:39 IST2026-04-11T08:38:16+5:302026-04-11T08:39:46+5:30

प्राथमिक माहितीनुसार हा खर्च दीड कोटी रुपये एवढा सांगण्यात येत असला तरी तो त्यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.

over one and half crore spent on ponda bypoll election 2026 wasted election was cancelled due to goa high court verdict | फोंडा पोटनिवडणुकीचा दीड कोटींचा खर्च वाया; हायकोर्टाच्या निवाड्यामुळे झाली होती रद्द

फोंडा पोटनिवडणुकीचा दीड कोटींचा खर्च वाया; हायकोर्टाच्या निवाड्यामुळे झाली होती रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: हायकोर्टच्या निवाड्यामुळे फोंडा विधानसभा पोटनिवडणूक मतदानाला अवघे काही तास असताना रद्द झाल्याने निवडणुकीसाठी तोपर्यंत राज्य सरकारच्या तिजोरीतून करण्यात आलेला खर्च वाया गेला. प्राथमिक माहितीनुसार हा खर्च दीड कोटी रुपये एवढा सांगण्यात येत असला तरी तो त्यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.

फोंडा पोटनिवडणुकीसाठी बुधवार, दि. ९ रोजी मतदान होणार होते. त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली होती. या विधानसभा मतदारसंघातील ठिकठिकाणच्या ४५ मतदान केंद्रांवर मंडप वगैरे उभारणे, पाण्याची व्यवस्था, तात्पुरते रॅम्प व इतर व्यवस्थाही झाली होती शिवाय कर्मचारी मानधन, साहित्य खरेदी, वाहन भाडे, व्हिडिओग्राफी, स्ट्रॉगरूम उभारणी, सुरक्षा व्यवस्था आणि इतर खर्चही झाला. निवडणूक यंत्रणेने त्याची तयारी पूर्ण केली होती, असे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सवलतीनुसार ८५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांचे आयोगाच्या पथकाने घरी जाऊन मतदान करुन घेतले होते. सेवा मतदारांनीही मतदान केले होते. १७१ मतदारांनी मतदानही केले होते. या कामीही खर्च झाला होता.

Web Title : फोंडा उपचुनाव रद्द; ₹1.5 करोड़ का खर्च बेकार गया।

Web Summary : उच्च न्यायालय के आदेश के कारण फोंडा उपचुनाव मतदान से कुछ घंटे पहले रद्द कर दिया गया। चुनाव की तैयारियों पर लगभग ₹1.5 करोड़ राज्य निधि बर्बाद हो गई, जिसमें मतदान केंद्र की स्थापना, कर्मचारियों का भुगतान और सुरक्षा शामिल है।

Web Title : Fonda by-election canceled; ₹1.5 crore spent in vain.

Web Summary : The Fonda by-election was canceled hours before voting due to a High Court order. Approximately ₹1.5 crore of state funds were wasted on election preparations, including polling station setup, staff payments, and security.