शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

गोमेकॉत कॅन्सर रुग्णांसाठी ओपीडी सुरू, अवयव रोपणास मणिपालला मान्यता नाकारली  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:18 PM

दोनापावल येथील मणिपाल इस्पितळाला अवयव रोपणासाठी आरोग्य खात्याने मान्यता नाकारली आहे. यापुढे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातच(गोमेकॉ) अवयव दान व अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया होतील अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

पणजी - दोनापावल येथील मणिपाल इस्पितळाला अवयव रोपणासाठी आरोग्य खात्याने मान्यता नाकारली आहे. यापुढे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातच(गोमेकॉ) अवयव दान व अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया होतील अशी भूमिका सरकारने घेतली आहे. आरोग्य सचिव अशोक कुमार यांनी यापूर्वी मणिपाल इस्पितळाला अवयव दान व रोपणाबाबतची परवानगी परस्पर देऊन टाकली असे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांचे म्हणणो असून राणो यांनी या प्रकरणी आरोग्य सचिवांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सरकारच्या गोमेकॉ इस्पितळात आठवडय़ाला दोनवेळा कॅन्सर रुग्णांसाठी ओपीडी सुरू करण्यात आली असून केएलईचे डॉक्टर गोमेकॉत उपलब्ध राहून रुग्णांना तपासणार आहेत.

मणिपाल इस्पितळाने अवयव दान व रोपणासाठीच्या प्रक्रियेसाठी सरकारची परवानगी मागितली होती. मात्र सरकारने ही परवानगी नाकारली असल्याचे मंत्री राणो यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. वास्कोतील ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव घेण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यात मणिपालमध्ये केली गेली. मात्र मुंबईतील ग्लोबल इस्पितळाच्या डॉक्टरांनी ही प्रक्रिया गोमेकॉ इस्पितळात रुग्णाला नेऊन तिथे करायला हवी होती, कारण मणिपाल इस्पितळाला परवानगी नाही असे मंत्री राणो यांचे म्हणणो आहे. त्या दिवशी आरोग्य सचिव अशोक कुमार यांनी दोन तासांत मणिपालमध्येच प्रक्रिया करण्यास परवानगी कशी काय दिली याची चौकशी सुरू झाली असल्याचे ते म्हणाले. आरोग्य सचिवांची भूमिका तपासली जाईल, कारण एकतर्फी मान्यता देऊन टाकण्याचा आरोग्य सचिवांना अधिकारच नाही, कुठच्याच अधिका:याला तसा अधिकार नसतो, असे त्यांनी सांगितले. येत्या 3क् दिवसांत स्टेट ऑर्गन अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लान्ट (सोटो) संस्था स्थापन करण्यास आपण गोमेकॉच्या डीनना सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

कॅन्सर रुग्णांसाठी ओपीडी (चौकट)

दरम्यान, बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात कॅन्सर रुग्णांसाठी शुक्रवारपासून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू झाली आहे. पूर्ण दर्जाचा बर्न्‍स युनिट व प्लॅस्टीक सजर्री विभाग याचेही आरोग्य मंत्री राणो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोकांचा जीव वाचविण्यासाठी हे दोन्ही विभाग उपयुक्त ठरतील, असे राणो म्हणाले. या विभागात डॉक्टर्स, परिचारिका व अन्य मनुष्यबळ कायम असेल. गोमेकॉ इस्पितळ आम्ही मजबूत करत आहोत. विभागीय कॅन्सर सेंटर गोमेकॉत स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू आहे, असे मंत्री राणो यांनी सांगितले. कॅन्सर ओपीडी बुधवारी व शुक्रवारी गोमेकॉत सुरू राहील.

यावेळी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नाडिस, डीन प्रदीप नाईक, वैद्यकीय अधीक्षक शिवानंद बांदोकर, बर्न्‍स विभागाचे प्रमुख डॉ. युरी आंबोरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाhospitalहॉस्पिटलnewsबातम्या