हणजूण येथील आॅनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दलालास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 19:33 IST2017-12-12T19:33:01+5:302017-12-12T19:33:15+5:30
म्हापसा : आॅनलाइन पद्धतीने चालवण्यात येत असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश हणजूण पोलिसांनी केला. या प्रकरणी एका दलालास अटक करून सहा युवतींची सुटका केली.

हणजूण येथील आॅनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दलालास अटक
म्हापसा : आॅनलाइन पद्धतीने चालवण्यात येत असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश हणजूण पोलिसांनी केला. या प्रकरणी एका दलालास अटक करून सहा युवतींची सुटका केली. हणजूण स्टारको जंक्शन येथे गि-हाईकांना पुरवण्यासाठी मुलींना आणण्यात येणार असल्याची खबर हणजूण पोलीस स्थानक निरीक्षक चेतन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिश वायंगणकर व इतरांनी सापळा रचला असता सायंकाळी ४च्या सुमारास एक युवक एका युवतीस जीए ०८ यू २६७३ या अॅक्टिव्हा स्कूटरवरून घेऊन आला व ती दोघे तेथे वाट पाहत थांबले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता बिलाल जमाल शेख (२५, रा. मुंबई) या दलालाने गि-हाईकाकडे देण्यासाठी युवतीला आणल्याचे सांगितले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील वेगवेगळ्या गेस्ट हाऊसमध्ये छापा घालून उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ठाणे येथून आणलेल्या आणखी पाच युवतींना ताब्यात घेतले.
तसेच एका युवतीकडून जीए ०८ यू २६७४ ही डिओ हस्तगत केली. आॅनलाइन पद्धतीने हा वेश्या व्यवसाय होत असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या बिलाल शेख या दलालाने दिली. हणजूण पोलिसांनी बिलाल शेख याचे विरुद्ध वेश्याव्यवसाय प्रतिबंधक गुन्हा नोंद करून अटक केली व त्या सहा युवतीची सुटका करून त्यांची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात केली. या प्रकरणी पोलिसांनी अॅक्टिव्हा व डिओ स्कूटरसह सहा मोबाइल जप्त केले असून उपनिरीक्षक हरिश वायंगणकर हे निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.