गोव्यात बंगळुरु येथील इसमाला गांजा प्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 15:20 IST2020-03-15T15:19:44+5:302020-03-15T15:20:08+5:30
अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा कलम २0 (ब) १९८५ अंतर्गंत भूषण याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

गोव्यात बंगळुरु येथील इसमाला गांजा प्रकरणी अटक
मडगाव: गोव्यात मूळ कर्नाटकातील बंगळुरु येथील एका इसमाला गांजा प्रकरणी पोलिसांनीअटक केली. भूषण जितेंद्र जे. बागाडिया (३८) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडे २४ ग्राम गांजा सापडला. त्याची किंमत २ हजार ४00 रुपये आहे.
दक्षिण गोव्यातील फातोर्डा पोलिसांनी ही कारवाई केली. काल शनिवारी रात्री पोलिसांनी येथील नेहरु स्टेडियमच्या व्हीआयपी गेटजवळ संशयास्पदरित्या घुटमळताना भूषण याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गांजा सापडला. नंतर त्याला रितसर अटक करण्यात आली.
अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा कलम २0 (ब) १९८५ अंतर्गंत भूषण याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक योगेश गावकर हे तक्रारदार आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुमेधा नाईक पुढील तपास करीत आहेत.