गोव्यात दोन ट्रकात अपघातात एका चालकाचा मृत्यू: अन्य वाहनावरील चालक व क्लिनर जखमी
By सूरज.नाईकपवार | Updated: March 2, 2024 14:35 IST2024-03-02T14:35:36+5:302024-03-02T14:35:47+5:30
Goa Accident News: गोव्यातील मडगाव काणकोण राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकात झालेल्या अपघातात एका ट्रकचा चालक उमेश तलवार (२३, बेळगाव) हा गंभीर जखमी होउन नंतर त्याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला.

गोव्यात दोन ट्रकात अपघातात एका चालकाचा मृत्यू: अन्य वाहनावरील चालक व क्लिनर जखमी
- सूरज नाईकपवार
मडगाव - गोव्यातील मडगाव काणकोण राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकात झालेल्या अपघातात एका ट्रकचा चालक उमेश तलवार (२३, बेळगाव) हा गंभीर जखमी होउन नंतर त्याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला. तर दुसऱ्या ट्रकचा चालक दियेश्वर सुजय पोतदार ( २६, कोल्हापूर ) व क्लिनर पुष्कर सुरेश कांबळे ( २४, कोल्हापूर ) हे दोघे जखमी झाले. यातील दियेश्वर याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले असून, पुष्कर याला इस्पितळातून डिसचार्ज देण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री अपघाताची वरील घटना घडली. उमेश तलावार चालिवत असलेला ट्रक बॉक्साईटची वाहुतक करीत असून, मडगावहून तो काणकोणच्या दिशेने जात होता तर विरुध्द बाजूने लाकडी साहित्य घेउन अन्य एक ट्रक येत होता.
खड्डे येथे या दोन्ही ट्रकांची एकमेकाला धडक बसली. अपघाताची माहिती कुंकळ्ळी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्दर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. क्रेनच्या मतदतीने वाहने रस्त्यावरुन हटविण्यात आली. अपघातामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकही खोळंबली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांचा रांगा लागल्या हाेत्या. उपनिरीक्षक कविता रावत पुढील पोलिस तपास करीत आहेत.