पाईप चोरी प्रकरणी एकाला अटक; फोंडा पोलिसांची कारवाई
By आप्पा बुवा | Updated: September 29, 2023 19:02 IST2023-09-29T19:01:45+5:302023-09-29T19:02:01+5:30
धारबंदोडा येथे रस्त्याच्या बाजूला पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या सहा पाईप चोरी केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका इसमास अटक केली आहे.

पाईप चोरी प्रकरणी एकाला अटक; फोंडा पोलिसांची कारवाई
फोंडा : धारबंदोडा येथे रस्त्याच्या बाजूला पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या सहा पाईप चोरी केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका इसमास अटक केली आहे. चोरी केलेल्या पाईपची किंमत अंदाजे अडीच ते तीन लाख एवढी आहे. सविस्तर वृत्तानुसार कंत्राटदार ऋषभ पाटील (राहणार पर्वरी) यांचे पाईपलाईन टाकण्याचे एक काम धारबांदोडा परिसरात सुरू होते.
सदरचे काम संपल्यानंतर शिल्लक राहिलेले पाईप परत नेण्यासाठी त्यांनी तिथेच ठेवलेले होते. 24 सप्टेंबर रोजी युवराज गोसावी (वय 44 ,राहणार कोपरवाडा कुर्टी ) ह्या इसमाने सदर पाईप चोरले. पाईप चोरल्याची गोष्ट लक्षात येताच कंत्राटदाराने फोंडा पोलिसात सविस्तर तक्रार नोंद केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आपल्या परीने तपास करून युवराज गोसावी याला अटक केली. त्याला सांगे न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसीयन पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या संदर्भात फोंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.