गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी फोंड्यात एकाच अटक
By आप्पा बुवा | Updated: November 26, 2023 17:05 IST2023-11-26T17:05:12+5:302023-11-26T17:05:17+5:30
पोलीस निरीक्षक तुषार लोटलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप पुढील तपास करत आहेत.

गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी फोंड्यात एकाच अटक
फोंडा - सुमारे एक लाख किमतीचा गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी कुर्टी येथील एका युवकाला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्तानुसार 25 नोव्हेंबर रोजी सपना पार्क येथे एक युवक गांजा घेऊन फिरत असल्या संबंधित माहिती पोलिसांना मिळाली होती . पोलिसांनी तात्काळ कारवाई करताना त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या जवळ सुमारे एक किलो गांजा संदर्भात अमली पदार्थ आढळून आला. ज्याची मार्केट किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे.
अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी विनय मुर्गेश हेब्बल, वय २५ वर्षे, मेस्तवाडा, फोंडा , मूळ विजापूर कर्नाटक याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक तुषार लोटलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप पुढील तपास करत आहेत.