Onam festival in Goa starts from Vasco | गोव्यात ओणम सणाचा वास्कोतून प्रारंभ    
गोव्यात ओणम सणाचा वास्कोतून प्रारंभ    

वास्को - केरळातील बांधवांकडून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या ओणम उत्सवाची गोव्यात पहील्यांदा सुरुवात वास्को भागातून झाली. गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाल्याच्या दुसºया वर्षापासून हा उत्सव येथे साजरा करण्यात येतो. त्या काळात दाबोळी, वास्को भागात असलेल्या काही सशस्त्र दलातील जवानांनी प्रथम ओणम उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. संपूर्ण गोव्यात सुमारे २ लाख केरळी बांधव वास्तव्य करत असून त्यांच्याकडून साजरा करण्यात येणाºया ओणम उत्साहात गोमंतकीय बांधवांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असत असल्याचे मागच्या काही वर्षापासून दिसून येते.

हा उत्सव आता गोव्यातील बहुतेक भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ओणम उत्सव हा कुठल्या एका धर्माचा नसून शेती कापणीच्या निमित्ताने हा उत्सव साजरा केला जातो. ओणम उत्सवात हिंदू , मुस्लीम तसेच ख्रिस्ती बांधव हे सर्वजण हा उत्सव साजरा करीत असल्याने ओणम हा एकात्मतेचे दर्शन घडवणारा उत्सव असल्याची प्रतिक्रीया ‘केरळ कल्चरल असोसिएशन’ चे अध्यक्ष तिरुनिलाथ रवीशंकर यांनी दिली.

टी. रवीशंकर यांनी सांगितले की, १९ डीसेंबर १९६१ सालात गोव्याला पोर्तुगिजापासून मुक्ती मिळाल्यानंतर पुढच्या वर्षी अर्थात १९६२ सालात पहील्यांदाच गोव्यात ओणम उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. त्या काळात दाबोळी भागात सशस्त्र दलाचे जवान वास्तव्य करायचे व त्यांनी पहील्यांदा मोठ्या उत्साहाने गोव्यात ओणम साजरा केला. यानंतर गोव्यात हळू हळू करून ओणम उत्सव साजरा होऊ लागला. पणजी, मडगाव, डिचोली व फोंडा भागातही सध्या हा उत्सव साजरा होतो. २००० सालात गोव्यात स्थापित असलेली विविध मल्याळी - केरळी संघटनांनी एकत्र येऊन त्यांनी पणजी शहरात मोठ्या उत्साहात ओणम सणाच्या निमित्ताने भव्य असा कार्यक्रम घडवून आणला. त्यानंतर कुठ्ठाळी, कळंगुट, झुआरीनगर अशा भागात केरळी समाजांची स्थापना होऊन नंतर येथही ओणमाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजीत करण्यास सुरवात झाल्याचे रवीशंकर यांनी सांगितले.

या उत्सवाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी बहुतेक केरळी बांधव आपल्या कुटूंबातच हा उत्सव साजरा करतात. त्यादिवशी आपल्या घरात विविध प्रकारची फुलांची सजावट करणे, सुमारे १० ते १५ शाकाहारी खाद्यपदार्थ आपल्या घरात बनवणे अशा पद्धतीने या उत्सवाचा आनंद लुटला जातो, असे रवीशंकर यांनी सांगितले.

दरम्यान, मंगोरहील - वास्को येथे असलेल्या केरळी बांधवांच्या अयप्पा मंदिराला ४१ वर्षे पूर्ण झालेली असून ओणम उत्सवाच्या निमित्ताने येथे आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते. पहिल्या दिवशी अयप्पा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ओणम साजरा करण्यात येतो.

गेल्या वर्षी केरळात पूरस्थिती निर्माण होऊन तेथे शेकडो नागरिकांना याचा मोठा त्रास सोसावा लागल्यानंतर वास्को तसेच गोव्यातील इतर भागात ओणम निमित्ताने काहीच कार्यक्रम आयोजित केले नव्हते. या कार्यक्रमासाठी जमवलेला निधी केरळातील पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी पाठवण्यात आला होता, अशी माहीती टी. रविश्ांकर यांनी दिली.

Web Title: Onam festival in Goa starts from Vasco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.