शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'ओंकार'कडून वाहनांचीही नासधूस; बागायतीचीही हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:01 IST

ओंकार हत्ती दिवसा पोटभर खाल्ल्यानंतर घनदाट जंगलात वास्तव्य करतो आणि सूर्य मावळतीकडे आल्यानंतर तो लोक वस्तीमध्ये प्रवेशतो.

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : तीन दिवसांपूर्वी राज्यात प्रवेश केलेल्या ओंकार हत्तीने बागायतीची नासधूस करण्याबरोबरच आता वाहनांचीही नासधूस करायला सुरुवात केली आहे. हत्तीने दोन दिवसांपूर्वी तीन वाहनांची नासधूस केली. काल, बुधवारी पहाटे एक कारची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे.

ओंकार हत्ती दिवसा पोटभर खाल्ल्यानंतर घनदाट जंगलात वास्तव्य करतो आणि सूर्य मावळतीकडे आल्यानंतर तो लोक वस्तीमध्ये प्रवेशतो. या ठिकाणी कवाथे, पोफळीची नासधूस त्याने सुरूच ठेवली आहे. आता ओंकार हत्तीने वाहनांकडे लक्ष वळवले आहे. हत्तीचा वनखात्याने जर वेळेत बंदोबस्त केला नाही, तर उगवेवासीयांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लोकांनी कायदा हातात घेतल्यास त्याला सरकार आणि वनखाते पूर्ण जबाबदार असेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

तिसऱ्याही दिवशीही ओंकारने उगवे परिसरात ठाण मांडून नासधूस करायला सुरुवात केली. हत्तीने अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे. हत्तीच्या पाठीमागे फिरण्याशिवाय किंवा तो कुठे जातो, याची माहिती घेण्यापलीकडे हे अधिकारी, कर्मचारी काहीच करू शकत नाहीत. सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. सरकारने प्रशिक्षित कर्मचारी आणून हत्तीला पकडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Elephant 'Omkar' Damages Vehicles, Crops; Locals Threaten Protest.

Web Summary : Elephant Omkar, after destroying crops, now damages vehicles in Pedne. Locals are frustrated with the forest department's inaction. Farmers warn of protests if the elephant isn't controlled soon, holding the government responsible for any resulting unrest.
टॅग्स :goaगोवाforestजंगलforest departmentवनविभाग