जुने गोवें ते दिवजा सर्कल मार्ग येत्या १० पासून ३० एप्रिलपर्यंत बंद

By किशोर कुबल | Updated: March 6, 2024 13:25 IST2024-03-06T13:25:05+5:302024-03-06T13:25:27+5:30

वाहतूक कदंब बायपास मार्गाने वळवणार

Old Goa to Divja Circle Route Closed from 10th to 30th April | जुने गोवें ते दिवजा सर्कल मार्ग येत्या १० पासून ३० एप्रिलपर्यंत बंद

जुने गोवें ते दिवजा सर्कल मार्ग येत्या १० पासून ३० एप्रिलपर्यंत बंद

पणजी : जुने गोवेतील बॅसिलिका ऑफ बॉ जीझस  जंक्शन ते दिवजा सर्कल (पणजी) पर्यंतचा संपूर्ण रस्ता स्मार्ट सिटीच्या कामांमुळे १० मार्च ते ३० एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.

या काळात वाहतूक कदंबा बायपास रोडकडे वळवली जाईल. तथापि, मध्यवर्ती मार्ग खालीलप्रमाणे बंद केले जातील.प्रस्तावित प्रकल्पाचे चार टप्प्यांमध्ये काम होणार आहे. ज्यामध्ये मलनि:सारण वाहिन्या आणि गॅस लाइन टाकणे यासारख्या कामांचा समावेश आहे.

पहिला टप्पा- विठ्ठल मंदिर (पानवेल) ते अमूल शॉप (फोंडवे)- १६९९ मीटर रस्ता - १० मार्च ते ३० एप्रिल
दुसरा टप्पा - अमूल शॉप (फोंडवे) ते अजुदा चर्च जंक्शन - ५३० मिटर रस्ता - १२ मार्च ते १५ एप्रिल
तिसरा टप्पा - अजुदा चर्च ते रायबंदर पाटो सर्कल- १२५३ मिटर रस्ता - २६ मार्च ते ३० एप्रिल
चौथा टप्पा - रायबंदर पाटो सर्कल ते चिंबल जंक्शन-८१५ मिटर रस्ता - ६ मार्च ते ३० एप्रिल

Web Title: Old Goa to Divja Circle Route Closed from 10th to 30th April