शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

गोव्याच्या पर्यटनाला ‘ओखी’ वादळाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 13:54 IST

ओखी वादळाचा गोव्याच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. किना-यांवर पर्यटकांना पहुडण्यासाठी घातलेले पलंग वाहून गेल्याने तसेच शॅकमध्ये पाणी शिरल्याने गेले दोन दिवस शॅक बंद आहेत.

पणजी : ओखी वादळाचा गोव्याच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. किना-यांवर पर्यटकांना पहुडण्यासाठी घातलेले पलंग वाहून गेल्याने तसेच शॅकमध्ये पाणी शिरल्याने गेले दोन दिवस शॅक बंद आहेत. शॅक व्यावसायिकांची लाखो रुपयांची उलाढाल यामुळे ठप्प झाली आहे. राज्यात ठिकठिकाणच्या किना-यांवर मिळून सुमारे ३५0 हून अधिक शॅक आहेत. अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार शॅकमध्ये पाणी शिरल्यानंतर विदेशी पाहुणे हॉटेलमध्ये परतले ते काही पुन: आलेच नाहीत. जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने गोव्यात मोठ्या संख्येने देश-विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात.

पर्यटन व्यावसायिकांना अर्थार्जनासाठी हाच कालावधी महत्त्वाचा असतो. किना-यांवरील शॅक हे पर्यटकांचे मोठे आकर्षण असते. शॅकमध्ये पाणी शिरल्याने स्थिती मोठे नुकसान झाले असून पाणी सध्या ओसरले तरी डागडुजी व इतर गोष्टींसाठी काही कालावधी लागेल. दक्षिण गोव्यातील मोबोर, उत्तर गोव्यातील मोरजी किना-याला सर्वाधिक झळ पोचली. शिवाय बागा, कळंगुट, हणजुण किना-यांवरील शॅकमध्येही पाणी शिरले. पाण्याची पातळी अचानक वाढल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कार्दोझ यांचा कळंगुटमध्ये शॅक असून समुद्राचे पाणी शॅकमध्ये शिरल्याने पलंग हटवावे लागल्याचे त्यांनी सांगितले. 

पर्यटन खात्याने किना-यांवरील स्थितीवर नजर ठेवली आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर मुंबईच्या दृष्टी लाइफ सेविंग कंपनीचे ६00 हून अधिक जीवरक्षक तैनात असतात. समुद्रात कोणी बुडत असल्यास त्या व्यक्तिला वाचविण्याचे काम हे जीवरक्षक करीत असतात. राज्यातील सर्व किनारे, धबधबे, मयें येथील तलाव आदी ठिकाणी जीवरक्षक तैनात केलेले आहेत. पर्यटकांनी समुद्रात उतरु नये, असे आवाहन दृष्टी लाइफ सेविंग कंपनीच्या अधिकाºयांनी केले आहे. पाळोळें किना-यावर रविवारी दोन आयरिश महिलांना बुडताना वाचविण्यात आले.दरम्यान, पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार केळशी, मोबोर व मोरजी किना-याला जास्त फटका बसला आहे. वादळात नुकसान झाल्यास मामलेदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आढावा घेऊन नुकसान भरपाई ठरवितात. गेले तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटन खात्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. खात्याचे अधिकारी तसेच दृष्टी लाइफ सेविंगचे जीवरक्षक किना-यावर लक्ष ठेवून आहेत. 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन