हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट: जुळ्या बहिणींना जामीन मंजूर

By वासुदेव.पागी | Updated: May 2, 2023 21:14 IST2023-05-02T21:14:30+5:302023-05-02T21:14:42+5:30

पणजी: इन्स्टाग्रामवर हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारा अपमानास्पद पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केलेल्या शजिया व रुबिया या ...

Offensive posts that hurt religious sentiments of Hindus: Twin sisters granted bail | हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट: जुळ्या बहिणींना जामीन मंजूर

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट: जुळ्या बहिणींना जामीन मंजूर

पणजी: इन्स्टाग्रामवर हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारा अपमानास्पद पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केलेल्या शजिया व रुबिया या जुळ्या बहिणींना पणजी प्रधान सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दोघाही संशयितांना अटक झाल्यास १० हजार रुपयांच्या हमीपत्रासह आणि एक जामीनसह त्यांना सोडण्यात यावे आदेशही न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत.  

जुळ्या बहिणींना न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन हा सशर्त आहे. त्यानुसार तपासात कोणत्याही प्रकारे अडथळे आणू नये अशीही अट आहे. संशयितांनी  तपासात सहकार्य करणे आणि तपास अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय गोव्याबाहेर न जाणे या अटीही त्यांच्यावर लादण्यात आल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर युजर्सनीं तीव्र हरकत घेतली होती आणि या प्रकरणात पोलीस महासंचालक आणि क्राईम ब्रँचच्या अधीक्षकांना कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कारवाई करताना क्राईम ब्रँचने या प्रकरणात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Offensive posts that hurt religious sentiments of Hindus: Twin sisters granted bail

टॅग्स :goaगोवा