‘गोंयच्या सायबा’वर आक्षेपार्ह टिप्पणी; युवकाला अटक करण्याची आपची मागणी

By पूजा प्रभूगावकर | Updated: May 26, 2024 16:54 IST2024-05-26T16:54:23+5:302024-05-26T16:54:33+5:30

ॲड. पालेकर यांनी याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना जाहीर आवाहन केले आहे.

Offensive comment on 'Gony's Saiba'; AAP demand to arrest the youth | ‘गोंयच्या सायबा’वर आक्षेपार्ह टिप्पणी; युवकाला अटक करण्याची आपची मागणी

‘गोंयच्या सायबा’वर आक्षेपार्ह टिप्पणी; युवकाला अटक करण्याची आपची मागणी

पणजी : ‘गोंयच्या सायबा’वर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी अभिषेक नामक या युवकावर धार्मिक भावना दुखावण्यासाठी कारवाई करून त्याला अटक करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी केली आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरील आपल्या हँडलवर सेंट फ्रान्सिस झेव्हियर अर्थात ‘गोंयचा सायब’ यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. ही टिप्पणी करून त्यांनी केवळ ख्रिश्चनच नव्हे, तर समस्त गोमंतकीयांच्या भावना दुखावल्या आहेत. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी व त्याच्यावर कारवाई करावी. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणीही पालेकर यांनी केली आहे.

ॲड. पालेकर यांनी याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना जाहीर आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्याबाबत भरभरून बोलले होते. याची आठवणही ठेवावी व धार्मिक भावना दुखावणाऱ्या युवकावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Offensive comment on 'Gony's Saiba'; AAP demand to arrest the youth