ओडीपीची सूत्रे अखेर सिद्धार्थ, जेनिफरच्या हाती
By Admin | Updated: July 15, 2015 01:47 IST2015-07-15T01:47:24+5:302015-07-15T01:47:36+5:30
ओडीपीची सूत्रे अखेर सिद्धार्थ, जेनिफरच्या हाती

ओडीपीची सूत्रे अखेर सिद्धार्थ, जेनिफरच्या हाती
पणजी : ताळगावच्या बाह्यविकास आराखड्यासाठी आलेले आक्षेप तसेच सूचनांची छाननी करून प्रसंगी जागांची व प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी उत्तर गोवा विकास प्राधिकरणाने (एनजीपीडीए) मंगळवारी उपसमिती नेमली. या समितीच्या अध्यक्षपदी पणजीचे भाजप आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर समितीच्या सदस्यपदी काँग्रेसच्या ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात व भाजपचे पणजीतील माजी नगरसेवक दीपक म्हापसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ताळगावच्या ओडीपीमध्ये कशा प्रकारच्या सुधारणा अपेक्षित आहेत, याविषयी सूचना करणारे तसेच यापूर्वीच्या काही चुकांना आक्षेप घेणारे निवेदन ताळगावच्या भाजप मंडळाने मंगळवारी एनजीपीडीएला सादर केले आहे.
दरम्यान, एनजीपीडीएने म्हापसा ओडीपीही खुला केला आहे. त्यासाठीही एक उपसमिती नेमली असून त्या समितीच्या अध्यक्षपदी फ्रँकी कार्व्हालो, तर सदस्यपदी पणजीचे महापौर शुभम चोडणकर व गिरीश उसकईकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकांकडून व बिल्डरांकडून आलेल्या सूचना व आक्षेपांची ही समिती छाननी करून पुढील निर्णय घेणार आहे. (खास प्रतिनिधी)