‘त्या’ शिक्षकाला वाचविण्यासाठी आता दबावतंत्र

By Admin | Updated: December 20, 2015 02:29 IST2015-12-20T02:28:40+5:302015-12-20T02:29:20+5:30

मडगाव : रिवण येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेला शिक्षक

Now the pressure is to save the teacher | ‘त्या’ शिक्षकाला वाचविण्यासाठी आता दबावतंत्र

‘त्या’ शिक्षकाला वाचविण्यासाठी आता दबावतंत्र

मडगाव : रिवण येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेला शिक्षक प्रवास नाईक याला वाचविण्यासाठी आता गावातील लोकांकडून दबावतंत्र सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी होणाऱ्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय शनिवारी रिवण येथे झालेल्या पालकांच्या बैठकीत घेण्यात आला. माजी सरपंच व विद्यमान पंच तसेच पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्ष वैशाली नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
दरम्यान, या सर्व तणावातून जावे लागलेल्या त्या विद्यार्थिनीला पालकांनी दुसऱ्या शाळेत दाखल केले आहे. त्या विद्यार्थिनीने एका शिक्षिकेला आपल्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला होता. या शिक्षिकेवरही सध्या काही पालकांकडून दबाव येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पालक-शिक्षक संघटनेच्या काही सभासदांची या शिक्षकावर केलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी आहे. व्यवस्थापनाने हे प्रकरण हाताळताना पालक-शिक्षक संघाला विश्वासात घेतले नाही, असा दावा काही सदस्यांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीत केला. ही बैठक रिवणच्या उत्कर्ष हायस्कूलच्या सभागृहात घ्यायला द्या, अशी या पालकांची मागणी होती. मात्र, शाळेच्या सभागृहात बैठक घेण्यास मान्यता न मिळाल्यामुळे शेवटी गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात ती घेण्यात आली. या बैठकीत व्यवस्थापन पालकांना सहकार्य करत नाही, असा दावा करून काहीजणांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवूच नये, अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला सर्व पालकांचा पाठिंबा मिळाला नसल्याने शेवटी सोमवारी वर्गावर व मंगळवारी स्नेहसंमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी मंगळवारी पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे.
विनयभंगाचा प्रकार २ डिसेंबरला घडला होता. ७ डिसेंबरला त्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगे पोलिसांत तक्रार दिली होती. यासंबंधीचा अहवाल शिक्षण खात्याला पाठविण्यात आला होता. शिक्षण खात्याने नंतर चौकशी सुरू केली होती (पान ६ वर)

Web Title: Now the pressure is to save the teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.