शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

गोव्यात बेकायदा डोंगर कापणा-यांना आता 10 लाख रुपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 9:11 PM

पणजी : बेकायदा डोंगर कापणी किंवा सखल भागात मातीचा भराव टाकून तो बुजविल्यास असलेल्या दंडाची रक्कम १ लाख रुपयांवरुन वाढवून १0 लाख रुपये करण्याची तरतूद असलेले गोवा नगर नियोजन दुरुस्ती विधेयक गुरुवारी विधानसभेत सादर करण्यात आले.

पणजी : बेकायदा डोंगर कापणी किंवा सखल भागात मातीचा भराव टाकून तो बुजविल्यास असलेल्या दंडाची रक्कम १ लाख रुपयांवरुन वाढवून १0 लाख रुपये करण्याची तरतूद असलेले गोवा नगर नियोजन दुरुस्ती विधेयक गुरुवारी विधानसभेत सादर करण्यात आले. यासह एकू ण तीन विधेयके सादर झालेली असून चालू अधिवेशनातच ती संमत केली जाणार आहेत.नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी हे विधेयक मांडले. दंडाची रक्कम वाढविण्यासाठी गोवा नगरनियोजन कायद्याच्या कलम १६ अ, १७ ब आणि कलम ४९ मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. एक वर्षाची साधी कैद किंवा १0 लाख रुपये दंड अथवा दोन्ही अशी तरतूद कायद्यात आहे. राज्यात डोंगर कापणीचे प्रकार वाढलेले आहेत. भरारी पथकाकडे तशा तक्रारीही सर्रासपणे येऊ लागल्या आहेत. शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस बघून अशी कृत्ये केली जातात.आल्वारा जमीनधारकांना दिलासाआल्वारा जमीनधारकांना जमिनींच्या मालकीचे हक्क बहाल करण्याचे अधिकार सरकारला मिळावेत यासाठी गोवा भू महसूल संहिता कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी सादर केले. आल्वाराधारकांना हक्क देण्यासाठी सरकारला आधी काही नियम निश्चित करावे लागतील व नतंरच अतिक्रमणांना कायदेशीर स्वरुप देता येईल. दुरुस्ती विधेयकात यासाठी महत्त्वाच्या तरतुदींचा अंतर्भाव केलेला आहे.स्थानिकांना घर, सदनिकांसाठी पायाभूत करातून वगळण्याची तरतूदसरकारी योजनांखाली स्थानिकांसाठी बांधली जाणारी लहान घरे किंवा सदनिका पायाभूत करातून वगळण्याची तरतूद असलेले २00९ च्या गोवा पायाभूत कर कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी विधानसभेत सादर केले. सध्या स्थानिकांना १00 चौरस मिटरपर्यंत छोट्या बांधकामांसाठी या करातून वगळलेले आहे. प्रत्यक्षात बांधकामासाठी प्रती चौरस मिटर २00 रुपये या प्रमाणे पायाभूत कर आकारला जातो.