शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

विरोधकांचा सगळा अवकाश काँग्रेसला व्यापू द्यायचा नाही, गोवा फॉरवर्डची नवी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 11:54 AM

आता भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक असलेला गोवा फॉरवर्ड पक्षही हे दोन्ही विषय हाती घेणार आहेत.

पणजी : राज्यातील खनिज खाण बंदीचा विषय व मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांचा विषय विरोधी काँग्रेस पक्षाने अलिकडे लावून धरला आहे. त्यानंतर आता भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक असलेला गोवा फॉरवर्ड पक्षही हे दोन्ही विषय हाती घेणार आहेत. आपण सत्तेत असलो तरी, विरोधी पक्षांसाठीचा सगळा अवकाश काँग्रेसला व्यापू द्यायचा नाही, असे गोवा फॉरवर्डच्या बैठकीत ठरले असून या निर्णयाची अंमलबजावणी आज बुधवारपासूनच सुरू होत आहे.

लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. गोव्यातील सांगे, केपे, डिचोली, फोंडा, धारबांदोडा व सत्तरी या सहा तालुक्यांमधील खनिज खाणी बंद असल्याने त्या भागातील मतदार अस्वस्थ आहेत. अशावेळी विरोधी काँग्रेस पक्ष खनिज खाणींचा विषय वारंवार मांडत आहे. आपणही याविषयी स्वस्थ न बसता खनिज खाणींचा विषय हाती घ्यावा असे गोवा फॉरवर्डने ठरवले आहे. खनिज खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी करणो हाच प्रभावी व लवकर अंमलात येऊ शकेल असा मार्ग असल्याची भूमिका यापूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांनी मांडली होती पण मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या डोक्यात काही तरी वेगळेच आहे. त्यांनी अजून खाणप्रश्नी पंतप्रधानांची भेट घेतलेली नाही. ते पंतप्रधानांना भेटून आल्यानंतरच खनिजखाणप्रश्नी स्पष्टता येईल. तथापि, खाणप्रश्न आणखी झुलवत न ठेवता तो लवकर सोडविला जावा म्हणून केंद्र व गोवा सरकारवर अप्रत्यक्षरित्या दबाव टाकण्याचे काम गोवा फॉरवर्ड करील, असे सुत्रंनी सांगितले.

विरोधी काँग्रेसने सातत्याने मांडवी नदीतील कॅसिनोंविरुद्धही आवाज उठवला आहे. गिरीश चोडणकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर या आवाजाला धार चढली. यापूर्वी विरोधात असताना भाजपही कॅसिनोंविरुद्ध आवाज उठवित आला. गेली पाच वर्षे भाजप सरकारकडून कॅसिनोप्रश्नी धोरण आणण्याची तसेच गेमिंग आयुक्त नेमण्याची फक्त घोषणाच केली जात आहे. प्रत्यक्षात कॅसिनो धोरण आणलेच जात नाही. कॅसिनो धोरण लवकर आणले जावे अशी मागणी गोवा फॉरवर्ड आता करणार आहे. 

गोवा फॉरवर्डच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी रात्री झाली. काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांमध्ये आपण कामाची  व्याप्ती वाढवावी व कॅसिनो, खनिज खाणी अशा विषयांवरून आपणही थोडे आक्रमक बनावे असे फॉरवर्डमध्ये तत्त्वत: ठरल्याचे सुत्रंनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवा