शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठीवर अन्याय केलेलाच नाही, गोमंतकीयांनाच नोकरी देणे हाच माझा हेतू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 07:51 IST

साखळी रवींद्र भवनात गोमंतक मराठी अकादमीच्या वतीने आयोजित सृजन संगम युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : गोव्यात परप्रांतीयांची संख्या वाढत असून त्यामुळे गोमंतकीयांना रोजगारात प्राधान्य आणि संधी मिळावी म्हणून आपल्या सरकारने कोंकणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गोव्याला मराठीची मोठी परंपरा असून मराठीत शिक्षण घेणाऱ्यांवर कोणताही अन्याय केलेला नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

साखळी रवींद्र भवनात गोमंतक मराठी अकादमीच्या वतीने आयोजित आज, मंगळवारी सृजन संगम युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकार परेश प्रभू लिखित 'गोमंतकाचा आत्मस्वर मराठी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

व्यासपीठावर गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, उपाध्यक्ष चंद्रकांत कृष्णा गवस, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, सृजन संगमच्या संयोजक पौर्णिमा केरकर तसेच रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य अनिल सामंत यांनी मनोगत व्यक्त केले.

'मराठी-कोंकणीला समान दर्जा द्या'

सरकारने राज्य सरकारी कर्मचारी भरती आयोगाच्या परीक्षेसाठी कोंकणी विषय अनिवार्य केला असून मराठी भाषेला डावललेले आहे. हा निर्णय गोमंतकाच्या मराठी भाषा आणि संस्कृतीच्या अस्तित्वाच्या मुळावर येणारा आहे. त्यामुळे गोवा मराठी अकादमी सरकारला आवाहन करते की, लवकरात लवकर या निर्णयाला स्थगिती द्यावी. गोवा घटक राज्य झाल्यापासून आजवरच्या सरकारने राजभाषा कायद्यानुसार कोंकणी आणि मराठीला समान स्थान दिले होते. यापुढेही समान स्थान द्यावे, अशी मागणी करणारे निवेदनही मराठी अकादमीने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

'लढा उभारूनच, हक्क मिळवावा लागेल'

दरम्यान, राजभाषा कायद्यात मराठीला सहभाषेचा दर्जा म्हणजे मराठीप्रेमींच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असून तो तसाच राहणार आहे. सध्याच्या सरकारी धोरणानुसार मराठीवर अन्याय सुरू आहे. त्यामुळे मराठीप्रेमींना पुन्हा एकदा मोठा लढा उभारावा लागेल, प्रा. सुभाष वेलिंगकर असे आवाहन प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे. स्व. भाऊसाहेब बांदोडकर व स्व. शशिकलाताई काकोडकर यांनी सुरू केलेल्या १२०० च्या वर सरकारी मराठी प्राथमिक शाळा बंद पाडण्यात येत आहेत. गेल्या १२ वर्षांत ४०० शाळा इतिहासजमा झाल्या आहेत. त्यामुळे मराठी शिकणारी मुले कमी झाली. त्यामुळे माध्यमिकपासून विद्यापीठीय स्तरावरचे मराठी विभाग आपोआप बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. त्यातच मराठी संस्थांना दिले जाणारे तुलनात्मक सरकारी अनुदान फारच कमी आहे. सरकारी पातळीवर कर्मचारी निवडीसाठी मराठी अनिवार्य केलेली नाही. हे नवीन गंडांतर सुरू झालेले आहे. भाषांतरासाठी आवश्यक सरकारी कर्मचारी भरती न करता, मराठी पत्रव्यवहार दुर्लक्षित करणे किवा उत्तरे इंग्रजीतूनच देणे ही मराठीची अहवेलनाच आहे, असेही ते म्हणाले.

मी मराठीतूनच प्राथमिक शिक्षण घेतले. आज मराठी-कोंकणी कोणताही वाद नाही. मराठी सहभाषा कायम असून तिच्यावर कोणताच अन्याय होणार नाही, याची हमी देतो. मराठी संदर्भात जे निवेदन दिले आहे त्या संदर्भात योग्य निर्णय घेण्याबाबत आमचे विचार मंथन सुरु आहे. तज्ज्ञांना सामावून घेत निश्चित योग्य निर्णय घेणार आहे. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतmarathiमराठी