शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

यंदा गोव्यात नो इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 3:42 PM

आतापर्यंत गोव्यातील पर्यटनातील परवलीचा शब्द झालेल्या ईडीएम अर्थातच इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल यंदा प्रथमच आयोजित न होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

मडगाव: आतापर्यंत गोव्यातील पर्यटनातील परवलीचा शब्द झालेल्या ईडीएम अर्थातच इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल यंदा प्रथमच आयोजित न होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यामुळे उत्तर गोव्यातील नागरिकांना यंदा या महोत्सवाच्या गोंगाटापासून मुक्ती मिळणार असली तरी गोव्याच्या पर्यटन व्यावसायिकांना मात्र त्याचा ब-याच मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे.2005 पासून गोवा हे अशा ईडीएम महोत्सवाचे पर्यटन नकाशावरील मुख्य केंद्र बनले होते. सनबर्न, सुपरसोनिक व टाईम आऊट 72 हे महोत्सव पर्यटकांचे आकर्षण ठरले होते. ख्रिसमसच्या दरम्यान उत्तर गोव्यातील समुद्र किना-यावर आयोजित केल्या जाणा-या या महोत्सवाला देशभरातील पर्यटक गर्दी करत होते. मात्र यंदा उत्तर गोव्याची किनारपट्टी या फेस्टिव्हलच्या अभावाने सुनी पडण्याची शक्यता आहे. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनीच ही शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले, यंदा अशा महोत्सवासाठी कुठल्याही आयोजकांनी प्रस्ताव दिलेले नाहीत, त्यामुळे यंदा गोव्यात ईडीएम्स आयोजित करण्याची शक्यता कमी आहे. मात्र अजूनही कुणी प्रस्ताव आणल्यास राज्य सरकार त्याला मान्यता देण्यास तयार आहे.गोव्यात 2007 पासून आयोजित केले जात असलेले सनबर्न फेस्टिव्हलने 2015 पासून गोव्यात हा महोत्सव आयोजित करण्याचे बंद करून त्याऐवजी पुणे या शहराला पसंती दिली आहे. मागच्या वर्षी गोव्यात टाईम आऊट 72 हा महोत्सव झाला होता. अशा महोत्सवासाठी आयोजक नोव्हेंबरच्या सुरुवातीस प्रस्ताव पाठवितात. मात्र यावेळी असा एकही प्रस्ताव आलेला नाही. यासंदर्भात विचारले असता आजगावकर म्हणाले, गोव्यात असे महोत्सव आयोजित करणे आयोजकांना महाग पडते. त्यामुळेच या कंपन्यांनी यंदा प्रस्ताव दिले नसावेत. सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांची थकबाकी अजूनही कायम असून मागच्या वर्षी आयोजित केलेल्या टाईम आऊटनेही राज्यातील कर भरलेले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले. या आयोजनासाठी जे शुल्क आकारले जाते त्यात कपात करावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडणार असल्याचेही आजगावकर यांनी सांगितले.यंदा असे महोत्सव आयोजित न झाल्यास गोव्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होईल, अशी भीती ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष सावियो मसायस यांनी व्यक्त केली. या महोत्सवात किती पर्यटक भाग घेतात याचा नक्की आकडा जरी माहीत नसला तरी ब-याच मोठ्या प्रमाणावर पर्यटक त्यानिमित्त गोव्यात येतात असे ते म्हणाले. 2007 पासून गोव्यात सनबर्न फेस्टिव्हल आयोजित केल्याबद्दल गोव्यातील पर्यटन व्यवसायात बराच मोठा बदल झाला होता. 2015 साली वागातोर येथे आयोजित केलेल्या चार दिवसांच्या सनबर्नसाठी सुमारे 70 हजार लोकांची हजेरी होती. यातील 15 टक्के लोक स्थानिक असण्याची शक्यता व्यक्त करून राहिलेले 60 हजार लोक भारतातील इतर राज्यातून तसेच विदेशातून आले होते. मुख्य म्हणजे हे सर्व हाय स्पेंडिंग गटात मोडणारे पर्यटक होते, अशी माहिती अन्य एका व्यावसायिकाने दिली.तो म्हणाला, गोव्यात येणारा पर्यटक आपल्या राहण्या-जेवणावर दर दिवशी 15 हजार रुपये सरासरी खर्च करतो. हे प्रमाण लक्षात घेतल्यास सनबर्नसारख्या फेस्टिव्हलच्या दरम्यान गोव्यात पर्यटन व्यवसाय क्षेत्रात होणारी उलाढाल 630 कोटी रुपयांच्या आसपास होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र गोव्यात असे फेस्टिव्हल्स आयोजित करणे आयोजकांसाठी फारशी फायद्याची गोष्ट ठरत नसल्यामुळेच ते गोव्याकडे आता आकर्षित होत नाहीत, असे आणखी एका पर्यटन व्यावसायिकाने सांगितले. मागच्या वर्षी गोव्यात आयोजित केलेल्या टाईम आऊट फेस्टिव्हलच्या आयोजकांना 40 कोटींचे नुकसान सोसावे लागले होते. मागच्या वर्षी तिकिटांची विक्री कमी पण कॉम्प्लिमेंटरी पास मोठय़ा प्रमाणावर अशी स्थिती असल्याने आयोजकांना हे नुकसान सोसावे लागले होते असे या व्यावसायिकाने सांगितले.