शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

गडकरी आणि गोवेकरांचं वेगळं नातं; पर्रिकरांनंतर गोव्याला दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 12:26 IST

पर्रिकर व गडकरी यांच्यात अनेक वर्षे मैत्री होती. गोव्यात जेव्हा भाजपचे सरकार अधिकारावरही आले नव्हते त्या काळात म्हणजे 90च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे नेते अधूनमधून गोव्यात यायचे

सदगुरु पाटील

पणजी : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे गोव्याशी एक वेगळे नाते अनेक वर्षे तयार होऊन राहिलेले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले व आता सुदिन ढवळीकर यांच्याकडे गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खाते राहिले नाही तरी, गोव्याकडे पाहण्याचा गडकरी यांचा दृष्टीकोन मुळीच बदललेला नाही. गोव्याला मदतीचा हात देण्याची गडकरी यांची भूमिका कायम राहिली असल्याचा अनुभव येत आहे.

पर्रिकर व गडकरी यांच्यात अनेक वर्षे मैत्री होती. गोव्यात जेव्हा भाजपचे सरकार अधिकारावरही आले नव्हते त्या काळात म्हणजे 90च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे नेते अधूनमधून गोव्यात यायचे आणि पर्रिकर यांना ते मार्गदर्शन करायचे. 2017 साली गोवा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही गडकरी यांनी गोव्यात धाव घेतली व गोव्यात पुन्हा परीकर यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठीची प्रक्रिया त्यांनी पार पाडली. पर्रिकर मुख्यमंत्रीपदी होते तेव्हा सुदिन ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते गोव्यात बांधकाम मंत्री होते. गडकरी यांची ढवळीकरांशीही मैत्री  होती. पर्रिकर व ढवळीकर देत असलेले प्रस्ताव गडकरी यांनी कायम मान्य केले व त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, नवे मोठे पुल अशा साधनसुविधा गोव्यात उभ्या राहिल्या. एकूण पंधरा हजार कोटींचे  प्रकल्प गडकरी यांनी गोव्याला दिले. गोव्यातील नद्यांचे राष्ट्रीयीकरण व्हायला हवे ही भूमिकाही गडकरी यांनीच पर्रिकरांना पटवून दिली व मग गोवा सरकारने ही भूमिका स्वीकारली.

आता प्रमोद सावंत मुख्यमंत्री आहेत आणि दिपक प्रभू पावसकर हे गोव्याचे नवे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. पावसकर यांनी बांधकाम मंत्री झाल्यानंतर प्रथमच बुधवारी दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांच्यासमोर पावसकर यांनी गोव्यातील खांडेपार ते अनमोड घाटर्पयतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा विषय मांडला. भू-संपादन प्रक्रियेतील अडचणींचाही विषय मांडला. हा महामार्ग आता सहापदरी होणार आहे व त्यासाठी गडकरी यांनी पूर्ण सहकार्याचा हात दिला आहे, असे पावसकर यांनी लोकमतला सांगितले. आपण लवकरच गोव्यात येईन व त्यावेळी प्रलंबित कामे मार्गी लावूया असेही गडकरी यांनी सांगितल्याचे पावसकर म्हणाले.गडकरी यांनी गोव्यातील कोणतेच काम कधी अडवून ठेवले नाही. तिसऱ्या मांडवी पुलालाही गडकरी यांच्यामुळेच केंद्र सरकारने चारशे-पाचशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मंत्री पावसकर यांनी गोव्यात डांबराचा मोठा तुटवडा आहे असे गडकरी यांना सांगितले. आम्ही विदेशातून डांबराची आयात करू पाहतोय असे पावसकर यांनी गडकरींना सांगितले व गडकरी यांनी लगेच मान्यता दिली. दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनीही स्वतंत्रपणे दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली.

टॅग्स :goaगोवाNitin Gadkariनितीन गडकरीManohar Parrikarमनोहर पर्रीकर