‘निपाह’बाबत गोव्यातही दक्षता, केरळमधून येणा-यांची तपासणी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 06:30 PM2018-05-22T18:30:45+5:302018-05-22T18:30:45+5:30

केरळमध्ये ‘निपाह’ या विषाणूच्या संसर्गामुळे काही लोकांचा जीव गेला आहे. हा आजार गोव्यातही येऊ शकतो, यासाठी आरोग्य खात्याने सर्व रुणालयांना दक्षतेचे आदेश दिलेले आहेत. याशिवाय केरळमधून गोव्यात येणा:या लोकांची तपासणी करावी, अशा सूचना आरोग्य मंत्री विश्वजीत राणो यांनी दिल्या आहेत.

'Nipah' alert In Goa | ‘निपाह’बाबत गोव्यातही दक्षता, केरळमधून येणा-यांची तपासणी होणार 

‘निपाह’बाबत गोव्यातही दक्षता, केरळमधून येणा-यांची तपासणी होणार 

Next

पणजी - केरळमध्ये ‘निपाह’ या विषाणूच्या संसर्गामुळे काही लोकांचा जीव गेला आहे. हा आजार गोव्यातही येऊ शकतो, यासाठी आरोग्य खात्याने सर्व रुणालयांना दक्षतेचे आदेश दिलेले आहेत. याशिवाय केरळमधून गोव्यात येणा:या लोकांची तपासणी करावी, अशा सूचना आरोग्य मंत्री विश्वजीत राणो यांनी दिल्या आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार ही दक्षता घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

‘निपाह’विषयी काय उपाययोजना करता येतील याविषयावर उद्या बुधवारी राणो यांनी आरोग्य खात्याची बैठक बोलाविली आहे. 

गोवा राज्य आरोग्य विभाग केरळ राज्यात पसरत असलेल्या ‘निपाह’च्या पाश्र्वभूमीवर तेथील आरोग्य खात्याशी सतत संपर्कात आहे. केरळमधून रेल्वेद्वारे येणा:या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचनाही आरोग्य खात्याला दिलेल्या आहेत. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि खासगी रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या गेल्या असून, ‘निपाह’ विषाणूचा संसर्ग झाल्याची एखादी केस आल्यास त्या रुग्णावर तत्काळ उपचार करावेत, असेही सांगण्यात आले आहे. 

प्रशासनाने पुढील काही दिवसात या भयंकर आजाराचे विषाणू गोव्यात आणि मुंबईत पसरू शकतात, अशी शक्यता वर्तविली आहे. केरळमध्ये आत्तार्पयत तीन लोक दगावले असून, अठरा जणांवर उपचार सुरू असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून, त्यात राष्ट्रीय आपत्कालीन नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. सुजीत कुमार सिंग आणि एपिडेमियोलॉजीचे प्रमुख डॉ. एसके जैन यांचा त्यात समावेश आहे. 

जागतिक आरोग्य संघनेने (डब्ल्यूएचओ) ‘निपाह’चा विषाणू पूर्णपणो नवा असून, तो प्राण्यांतून लोकांमध्ये प्रवेश करीत आहे. त्यामुळे हा विषाणू प्राण्यांनाही आणि लोकांनाही घातक आहे. या आजाराचा विषाणू 2क्क्8 मध्ये मलशियामध्ये कांपुंग सुंगई निफा येथे आढळला होता. त्यामुळे या विषाणूला ‘निपा’ असे नाव देण्यात आले आहे. या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाहीए. त्यामुळे लोकांनीच त्याच्यापासून सुरक्षितता पाळणो गरजेचे आहे. 

Web Title: 'Nipah' alert In Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.