शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
4
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
5
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
6
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
7
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
8
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
10
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
11
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
12
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
13
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
14
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
15
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
16
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
17
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
18
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
19
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
20
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
Daily Top 2Weekly Top 5

नवा जिल्हा कुणासाठी? कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:27 IST

गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांची शेजारच्या जिल्ह्यांशी तुलना केल्यास त्यांचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे.

अनंत अग्नी, मुख्याध्यापक

गोवा शासनाने सध्या एका नव्या जिल्ह्याच्या निर्मितीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे वाटते. गोव्यासारख्या छोट्या राज्याला खरोखरच तिसऱ्या जिल्ह्याची गरज आहे का, हा खरा प्रश्न आहे. शासनाला तडकाफडकी हा निर्णय घेण्याची गरज का भासली, हे लोकांना समजणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकहिताचे दूरगामी परिणाम असलेले निर्णय घेताना संबंधितांना विश्वासात घेणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे. कुणीही मागणी केलेली नसताना काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा या तालुक्यांचा समावेश असलेला नवीन जिल्हा स्थापन करण्यामागे शासनाचे प्रयोजन काय आहे, हे लोकांना पटवून देणे गरजेचे आहे.

गोव्यात सध्या दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांची तुलना आपण शेजारील तीन जिल्ह्यांशी करूया. गोव्याच्या उत्तरेला असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५२०७ चौ. किलोमीटर आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ८,४९,६५१ इतकी आहे. ओरोस येथे या जिल्ह्याचे मुख्यालय असून तिथून सर्वात दूरचा मांगेली हे गाव १०० किमी अंतरावर वसलेले आहे. गोव्याच्या दक्षिणेला कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नडा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १०,२९१ चौरस किलोमीटर इतके असून लोकसंख्या १४,३७,१६९ इतकी आहे. या जिल्ह्याचे मुख्यालय कारवार येथे असून सर्वात दूरचे भटकळ गाव १२३ किलोमीटर अंतरावर आहे. तर बेळगावी जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १३,४१५ चौरस किलोमीटर इतके असून लोकसंख्या ४७,७९,६६१ इतकी आहे. बेळगावी हे या जिल्ह्याचे केंद्र असून सर्वांत दूरचे अथणी हे गाव १५० किलोमीटरवर स्थित आहे. आता या तुलनेत गोव्याचे दोन्ही जिल्हे घेऊया. 

दक्षिण गोव्याचे एकूण क्षेत्रफळ १९६६ चौरस किलोमीटर आहे, तर लोकसंख्या ६,४०,५३७. मडगाव शहरात या जिल्ह्याचे मुख्यालय असून दक्षिण टोकावरील पोळे गाव तिथून ५० किलोमीटर अंतरावर आहे. उत्तर गोवा जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७३६ चौरस किलोमीटर असून लोकसंख्या ८,१८,००८ इतकी आहे. पणजी या मुख्यालयापासून उत्तर टोकावरील पत्रादेवी गाव ३५ किलोमीटरवर आहे. गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांची शेजारच्या जिल्ह्यांशी तुलना केल्यास त्या जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्रफळ, लोकसंख्या, मुख्यालयापासून शेवटच्या टोकावर असलेल्या गावाचे अंतर गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. त्यामुळे गोव्याला खरोखरच तिसऱ्या जिल्ह्याची गरज आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. देशातील अनेक जिल्ह्यांचे क्षेत्रफळ तसेच लोकसंख्या संपूर्ण गोवा राज्यापेक्षाही जास्त आहे.

मुळात प्रश्न असा आहे की, नव्या जिल्ह्याच्या स्थापनेसाठी जी शासकीय समिती घडविली होती त्यातील किती सदस्यांना गोव्याच्या भौगोलिक रचनेची कल्पना होती? नव्या जिल्ह्याचा हा आराखडा कार्यालयात बसून तयार केलेला आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते आहे. नपेक्षा, काणकोण तालुक्यातील लोकांना अडचणीची होईल अशी नव्या जिल्ह्याची रचना झालीच नसती. दक्षिण गोवा जिल्ह्याचे सध्याचे मुख्यालय मडगाव शहरात आहे. मडगाव ही गोव्याची व्यावसायिक राजधानी आहे. 

काणकोणमधून शेकडो लोक दररोज येथे व्यवसाय तसेच व्यापारासाठी येतात. खोतीगाव, गावडोंगरी, खोलासारख्या दुर्गम भागांतून आदिवासी महिला आपल्या शेतात पिकविलेली भाजी तसेच फळे येथील बाजारात आणून विकतात. काणकोणमध्ये नोकरी-धंद्याच्या जास्त संधी उपलब्ध नसल्याने गेली अनेक वर्षे मडगाव शहर काणकोणकरांसाठी रोजीरोटीचे शहर बनलेले आहे. काणकोणमधील व्यापाऱ्यांसाठी मडगाव हे खरेदीचे प्रमुख केंद्र आहे. मडगाव शहरात आल्यावेळी एका भेटीत काणकोणकर अनेक कामे उरकू शकतात.

मडगाव हे सध्याच्या दक्षिण गोवा जिल्ह्याचे केंद्र काणकोणकरांसाठी अनेक दृष्टींनी सोयीचे ठिकाण आहे. १९९३ साली श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाची स्थापना होइस्तोवर काणकोण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मडगाव हेच शिक्षणासाठीही प्रमुख केंद्र होते. अजूनही अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या ज्या शाखा काणकोणात उपलब्ध नाहीत, त्यासाठी मडगाव शहरावर विसंबून असतात. या शहराशी काणकोणवासीयांचे फक्त भावनिकच नव्हे तर व्यावहारिक नाते तयार झालेले आहे.

नोकरी, धंदा तसेच मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने काणकोण तालुक्यातील अनेक कुटुंबे मडगाव शहरात वास्तव्य करून राहतात. काणकोण तालुक्यातील सामान्य लोकांच्या जिल्हा कार्यालयांतील बऱ्याचशा कामांचा पाठपुरावा तेच करतात. त्याचा फायदा काणकोणात राहणाऱ्या सामान्य माणसाला होतो. काणकोणच्या एखाद्या व्यक्तीला उपचारासाठी मडगावच्या जिल्हा रुग्णालयात भरती केल्यास मडगावमध्ये राहणारे त्याचे काणकोणकर नातेवाईक किंवा शेजारी त्याच्या मदतीस धावतात.

काणकोण तालुक्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गावातून मडगावला यायला सार्वजनिक वाहतूक सुविधा सहज उपलब्ध आहे. त्या तुलनेत केपे, कुडचडेसारख्या शहरात फक्त काणकोणमधील शहरी भागातूनच आणि तीही तुरळक प्रमाणात वाहतूक सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे केपे हे जिल्ह्याचे मुख्यालय झाल्यास काणकोणच्या सामान्य जनतेवर बाळ्ळीपर्यंत एक बस आणि नंतर केपेपर्यंत - दुसरी, असा द्रविडी प्राणायाम करण्याची वेळ येणार आहे. 'फातर्फेच्यान गोंय लागीं' या कोंकणी म्हणीसारखी काणकोणकरांची गत होणार.

कोंकणी भाषेत एक म्हण आहे, 'यो वच कुसमणां, दीस गेलो जेवणां.' या म्हणीचा अर्थ असा की पोर्तुगीज काळात कुसमण म्हणजेच केपे शहरात शासकीय कार्यालये असायची. नेत्रावळी, रिवण इत्यादी दुर्गम भागातून लोक आपल्या कामासाठी कुसमणला पायी चालत यायचे. येताना दुपारचे जेवण बांधून आणायचे. हे लोक कुसमणला पोहोचेपर्यंत कार्यालये दुपारच्या जेवणासाठी बंद झालेली असायची. संध्याकाळी कार्यालये पुन्हा सुरू होईपर्यंत चार वाजलेले असायचे. परतीचा रस्ता घनदाट जंगलातून असायचा. हिंस्त्र श्वापदांचा धोका असायचा. त्यामुळे कामासाठी आलेली माणसे कार्यालये पुन्हा सुरू होण्याची वाट न पाहताच पुन्हा घरी परतायची. काणकोणवासीयांवर आता हीच पाळी येणार आहे.

शासन एका बाजूला 'प्रशासन तुमच्या दारी' म्हणून लोकांच्या दारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे, दुसऱ्या बाजूने वर्षानुवर्षे सहजपणे आणि सोयिस्करपणे चालत आलेली व्यवस्था मोडून लोकांसाठी नव्या अडचणी तयार करत आहे. तिसरा जिल्हा निर्माण करायचाच असेल, तर जरूर करा, पण काणकोण तालुक्याचा समावेश मडगाव मुख्यालय असलेल्या जिल्ह्यातच राहू द्या, ही काणकोणच्या जनतेची ठाम मागणी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. काणकोण तालुक्यातील प्रत्येक पंचायतीमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करून शासनाने लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज आहे.

लोकांच्या हिताचा निर्णय लोकांनाच घेऊ द्यावा, अशी शासनाला विनंती आहे. काणकोणकरांच्या लोकभावनेचा मान राखून शासन आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल, असा काणकोणकरांना विश्वास आहे..

English
हिंदी सारांश
Web Title : New District: For Whom? What Purpose? Konkan Residents Question.

Web Summary : Goa's new district plan faces opposition. Concerns raised about necessity, public consultation, and Konkan residents' inconvenience. Madgaon's accessibility for Konkan is highlighted.
टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार