जगात शांती प्रस्थापित करण्याची गरज
By Admin | Updated: January 4, 2015 02:29 IST2015-01-04T02:28:52+5:302015-01-04T02:29:26+5:30
रेव्हरंड साल्वादोर पेनाचिओ : शवप्रदर्शन सोहळ्यासाठी गोव्यात दाखल

जगात शांती प्रस्थापित करण्याची गरज
वास्को : भारताबरोबर इतर राष्ट्रांनाही जगात शांतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़ आपणास गोव्यात येऊन शवप्रदर्शन पाहण्याचा लाभ मिळाला त्याचा आनंद झाल्याचे पोप यांचे भारत, नेपाळचे प्रतिनिधी रेव्हरंड साल्वादोर पेनाचिओ यांनी सांगितले़
जुने गोवे येथील से कॅथेड्रलमध्ये सुरू असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवदर्शन सोहळ्याच्या रविवारी होणाऱ्या सांगता समारंभास उपस्थित राहण्यासाठी त्यांचे शनिवारी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले़
या वेळी गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव, त्यांचे सचिव ज्योकी लोयोला फर्नांडिस, शवप्रदर्शन सोहळ्याचे प्रमुख मायकल डिसोझा, आमदार कार्लुस आल्मेदा यांनी त्यांचे स्वागत केले़ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़ दाबोळी विमानतळ परिषदगृहात पत्रकारांशी वार्तालाप केला़ रेव्हरंड साल्वादोर पेनाचिओ म्हणाले की, आपण पोपचे प्रतिनिधी म्हणून सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शन सोहळ्याच्या सांगता समारंभास उपस्थित राहण्यासाठी गोव्यात आलो आहोत़ पोप साहेबांनी सर्व गोमंतकीयांना सुख, शांती व समृध्दीचा संदेश दिल्याचे त्यांनी या वेळी सांगितले़ आर्चबिशप फि लीप नेरी फेर्रांव म्हणाले की, लोकांनी या शवप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे़ रविवारी सकाळी ९़३० वाजता धार्मिक प्रार्थना झाल्यावर सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव पुन्हा नियोजित स्थळी समारंभपूर्वक ठेवण्यात येईल़ हा कार्यक्रम आटोपून आपण येत्या १४ जानेवारी रोजी गोव्याचे दुसरे संत फा़ जुझे वाझ यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त श्रीलंकेला जाणार असल्याचे ते म्हणाले़
आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले, सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शवप्रदर्शन सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी गोवा सरकारने सर्वतोपरी सहकार्य केले़ (प्रतिनिधी)