राष्ट्रवादीत फुटीचे प्रयत्न फोल
By Admin | Updated: December 27, 2014 01:11 IST2014-12-27T00:59:11+5:302014-12-27T01:11:31+5:30
काँग्रेसचा डाव तूर्त फसलाच

राष्ट्रवादीत फुटीचे प्रयत्न फोल
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघा नेत्यांना काँग्रेसमध्ये ओढण्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्यामार्फत केलेले
प्रयत्न अयशस्वी ठरले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर, माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांना काँग्रेसमध्ये प्रवेश द्यावा, असे फालेरो यांनी ठरविले होते. तिघांशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्याची जबाबदारी फालेरो यांनी कळंगुटचे माजी आमदार फर्नांडिस यांच्यावर सोपवली होती. फर्नांडिस हे फालेरो यांच्या खूप विश्वासातील मानले जातात. पणजी परिसरातील एका फ्लॅटमध्ये फर्नांडिस यांनी राष्ट्रवादीच्या तिन्ही नेत्यांना बोलावले व तेथे बैठक झाली. हळर्णकर, डिसोझा व डिमेलो यांनी बैठकीत भाग घेतला. तिघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या तरी सोडणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर फर्नांडिस यांनी फोनवरून तिघांनाही फालेरो यांच्याशी बोलायला लावले. फालेरो यांच्याशी बोलणी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी येत्या जानेवारीत काय तो निर्णय कळवतो, असे फालेरो यांना सांगितले. त्यामुळे येत्या महिन्यात पुन्हा एकदा तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. (पान २ वर)