राष्ट्रीय पक्षी मोर ठरणार ‘उपद्रवी’?
By Admin | Updated: February 13, 2016 02:52 IST2016-02-13T02:46:49+5:302016-02-13T02:52:11+5:30
पणजी : मोर हा राष्ट्रीय पक्षी असला, तरी गोव्यातील शेतकऱ्यांचे पीक तो नष्ट करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे मोरालाही ‘उपद्रवी पक्षी’ म्हणून जाहीर

राष्ट्रीय पक्षी मोर ठरणार ‘उपद्रवी’?
पणजी : मोर हा राष्ट्रीय पक्षी असला, तरी गोव्यातील शेतकऱ्यांचे पीक तो नष्ट करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे मोरालाही ‘उपद्रवी पक्षी’ म्हणून जाहीर करण्याचा विचार सरकार करत आहे.
माकडे व जंगली डुकरांप्रमाणेच मोरांकडूनही शेतकऱ्यांचे पीक नष्ट केले जाते. त्यामुळे मोरांनाही उपद्रवी पक्षी म्हणून जाहीर करण्याच्या मागणीवर सरकारी अधिकाऱ्यांची समिती विचार करील, असे कृषिमंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले. माकडे व जंगली डुकर शेतीचे नुकसान करत असल्याने त्यांना ‘उपद्रवी प्राणी’ म्हणून जाहीर करण्याचा विचार आम्ही विधानसभेतही व्यक्त केला होता. संबंधित समिती स्थितीचा आढावा घेईल व योग्य तो निर्णय घेईल, असे मंत्री तवडकर म्हणाले. डोंगराळ भागांमध्ये शेतकऱ्यांना मोरांचा उपद्रव आहे, असे ते म्हणाले. मोर देशात कुठेच उपद्रवी पक्षी म्हणून जाहीर केलेला नाही, हेही त्यांनी नमूद केले.
माकडे व रानटी डुकर नियमितपणे शेतकऱ्यांची हानी करतात. काही प्राणी हे उपद्रवी म्हणून जाहीर करण्याची वेळच आली आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही सांगितले. मुख्यमंत्र्यांनी हा विषय निर्णयासाठी मुख्य सचिवांकडे सोपवला आहे. त्याविषयीची फाईल सध्या मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांच्याकडे आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांकडून सरकारकडे अनेक निवेदने आलेली आहेत.
(खास प्रतिनिधी)