म्हापशात ८० हजार किंमतीचा अमंली पदार्थ जप्त; आंतरराज्य बस स्थानकाजवळील पार्किंग जागेत सापडले
By काशिराम म्हांबरे | Updated: October 31, 2023 16:11 IST2023-10-31T16:10:35+5:302023-10-31T16:11:26+5:30
येथील आंतरराज्य बस स्थानकाजवळील पार्किंग जागेत त्याला अटक करण्यात आली.

म्हापशात ८० हजार किंमतीचा अमंली पदार्थ जप्त; आंतरराज्य बस स्थानकाजवळील पार्किंग जागेत सापडले
म्हापसा- म्हापसा पोलिसांनी पश्चिम बंगालातील जरजीत आलम ( वय २२) या युवकाकडून ८० हजार रुपये किमतीचा तसेच ८५० ग्राम वजनाचा गांजा हा अमंली पदार्थ जप्त केला आहे. येथील आंतरराज्य बस स्थानकाजवळील पार्किंग जागेत त्याला अटक करण्यात आली.
उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हा ग्राहकाला अमंली पदार्थ देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती. त्यानुसार निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला ताब्यात घेण्यास सापळा रचण्यात आलेला. रचलेल्या सापळ्यातून त्याला अटक करण्यात आली.
संशयिताला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पुढील तपास कार्य उपनिरीक्षक गौरव नाईक यांच्या वतिने सुरु करण्यात आले आहे.