कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त 

By काशिराम म्हांबरे | Updated: July 12, 2024 12:50 IST2024-07-12T12:50:42+5:302024-07-12T12:50:57+5:30

बेकायदेशीररित्या बाळगलेला ८० हजार रुपये किंमतीचा तसेच ८०५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. 

Narcotics seized in Calangute  | कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त 

कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त 

म्हापसा: काशिराम म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क

गोव्यातील किनारी भागात बिगर पर्यटन हंगामातही अंमली पदार्थाची तस्करी सुरुच आहे. कळंगुट पोलिसांनी परबोवाडा येथे छापा टाकून संशयित संजोय सुकलाबैद्य ( वय २७, मूळ आसाम) याला अटक करुन त्यांनी बेकायदेशीररित्या बाळगलेला ८० हजार रुपये किंमतीचा तसेच ८०५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. 


निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ग्राहकाला वितरीत करण्यासाठी संशयित अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना लागली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आलेला. छापा मारण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आली होती.   रचलेल्या सापळ्यात तो अडकल्यानंतर त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. संशयिताने वापरलेली दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कार्य उपनिरीक्षक प्रजीत मांद्रेकर करीत आहे.

Web Title: Narcotics seized in Calangute 

टॅग्स :goaगोवा