शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

महाराष्ट्र, छत्तीगढ व पश्चिम बंगालचे खासदार प्रश्न विचारण्यात सक्रीय; एडीआरचे विश्लेषण

By किशोर कुबल | Updated: March 27, 2024 18:25 IST

पाच वर्षात लोकसभेची १५ अधिवेशने झाली व प्रत्यक्षात २७३ दिवस कामकाज झाले. सरासरी दरवर्षी ५५ दिवसांचे कामकाज झाले, आतापर्यंतचे हे सर्वात कमी कामकाज असल्याचे एडीआरने म्हटले आहे. 

किशोर कुबल

पणजी : असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) एका विश्लेषणात पाच वर्षातील लोकसभा कामकाजाविषयी माहिती उघड केली आहे. प्रश्न विचारण्याच्या बाबत महाराष्ट्र, छत्तीगढ व पश्चिम बंगालचे खासदार जास्त सक्रीय राहिले.पाच वर्षात लोकसभेची १५ अधिवेशने झाली व प्रत्यक्षात २७३ दिवस कामकाज झाले. सरासरी दरवर्षी ५५ दिवसांचे कामकाज झाले, आतापर्यंतचे हे सर्वात कमी कामकाज असल्याचे एडीआरने म्हटले आहे.  पाच वर्षांच्या कालावधीत १७ जून २०१९ ते ६ ॲागस्ट २०१९ हा कामकाजाचा सर्वात जास्त कालावधी होता. प. बंगालचे खासदार डॉ. सुकांता मजुमदार यांनी सर्वाधिक ५९६ प्रश्न विचारले. पाच वर्षांच्या काळात एकुण ९२,२७१ प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्यात आली. २४० विधेयके मांडली व २२२ संमत केली. ११ विधेयके मागे घेतली. ६ विधेयके प्रलंबित आहेत.

एकाच दिवशी महत्त्वाची विधेयके संमत करण्यात आली. यात जम्मु काश्मीर पुनर्गठन दुरुस्ती विधेयक २०२३ व नागरिकत्त्व सुधारणा विधेयक २०१९ चा समोवश होता. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन भारत-प्रशासित केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. या कायद्यात १०३ कलमांचा समावेश आहे, १०६ केंद्रीय कायदे केंद्रशासित प्रदेशांना विस्तारित केले आहेत, १५३ राज्य कायदे रद्द केले आहेत आणि जम्मू आणि काश्मीर विधान परिषद रद्द केली आहे. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात १२ ऐवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर आणि त्यांच्याकडे उचित कागदपत्रे नसली, तरी भारताचे नागरिकत्व मिळेल. मुस्लिम देशांमधून भारतात सीमा ओलांडून आलेल्यांना बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही.