मडगाव आंदोलनाचा हेतू राजकीय: सदानंद तानावडे; लोकांना वेठीस धरणे चुकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2024 12:47 IST2024-10-09T12:46:24+5:302024-10-09T12:47:40+5:30
आंदोलकांवर कठोर कारवाई करा

मडगाव आंदोलनाचा हेतू राजकीय: सदानंद तानावडे; लोकांना वेठीस धरणे चुकीचे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मडगावचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. आंदोलकांवर सरकारकडून कारवाई व्हायला हवी, असे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
'कोणत्याही मागणीसाठी आंदोलन करणे हे चूक नव्हे. मागण्या शांतपणेही मांडता येतात. मडगाव येथे शनिवारी आंदोलकांनी जे काही केले ते योग्य नव्हे' असे ते म्हणाले. तानावडे म्हणाले की, एक व्यक्ती इस्पितळात असलेल्या वडिलांना भेटायला जात असताना त्याला रोखून गैर वागणूक दिली. मुलीला दुचाकीवरुन शाळेतून आणताना तिच्या वडिलाचे हेल्मेट खेचून हल्ला करण्यात आला. हे अत्यंत चुकीचे आहे.'
आज प्रत्येकजण राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मडगावचे आंदोलनही असेच राजकीय हेतून प्रेरित आहे. पोलिस दुसऱ्या दिवशी आंदोलकांशी कडक वागले. पहिल्या दिवशीच कडक कारवाई हवी होती. - सदानंद तानावडे