शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या बांधकाम क्षेत्रास अधिक निधी

By admin | Updated: June 24, 2014 01:21 IST

पणजी : गेल्या वर्षी गोव्याच्या बांधकाम क्षेत्रास जेवढा निधी मिळाला, त्यापेक्षा जास्त निधी या वेळी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन

पणजी : गेल्या वर्षी गोव्याच्या बांधकाम क्षेत्रास जेवढा निधी मिळाला, त्यापेक्षा जास्त निधी या वेळी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिल्लीत झालेल्या बैठकीवेळी गोव्याचे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांना दिली. गेल्या वर्षी गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्त्यांच्या कामासाठी केंद्राने प्रथम १७५ कोटी रुपये आणि नंतर २५ कोटी रुपये मिळून एकूण दोनशे कोटी रुपये दिले होते. यंदा यापेक्षा जास्त निधी दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री गडकरी यांनी आपल्याला दिल्याचे मंत्री ढवळीकर यांनी दिल्लीतील बैठकीनंतर ‘लोकमत’ला सांगितले. जुवारी पुलाबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे यापूर्वी गडकरी यांच्याशी बोलले आहेत. आपण गोव्याच्या बांधकाम क्षेत्रातील अन्य विषयांबाबत गडकरी यांच्याशी चर्चा केली. यंदा सुमारे तीनशे कोटींचा निधी अपेक्षित आहे, असे ढवळीकर म्हणाले. दरम्यान, मंगळवारी गोव्याचे प्रधान बांधकाम सचिव व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे. त्या वेळी गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील विविध पूल, राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण व अन्य प्रस्तावांबाबत चर्चा होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. जुवारी नदीवर दुसरा पूल बांधण्यासाठी गोव्याला केंद्राकडून एक हजार कोटींपेक्षा जास्त निधीची गरज असल्याचे गोव्याने यापूर्वीच केंद्राला कळविले आहे. एवढा निधी देण्याची मोदी सरकारची तयारी आहे, असे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)