'मोगा' ने घेतला दांडिया आणि गरबाचा खेळण्याचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 15:47 IST2023-10-23T15:47:33+5:302023-10-23T15:47:50+5:30
दांडिया सुरू असताना अचानक मोगा आला, आणि एवढेच नाही तर मोगाने उपस्थितांसोबत दांडिया आणि गरबा खेळण्याचा आनंद लुटला.

'मोगा' ने घेतला दांडिया आणि गरबाचा खेळण्याचा आनंद
समीर नाईक
पणजी: राज्यात ३७ वी राष्ट्रिय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर ज्योत रिले आणि स्पर्धेचे शुभांकर असलेला मोगा फिरून जनजागृती करत असताना दिसत आहे. सध्या ज्योत रिले राज्यभर फिरून तीसवाडी येथे पोहचली असून ठिकठिकाणी आमदार, सरपंच, पंच सदस्य, शालेय विद्यार्थी व नागरिक यांच्याकडून या ज्योत रिले आणि मोगाचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात येत आहे.
मोगा राज्यभर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे आकर्षण ठरत आहे. प्रत्येक शाळेत मोगाने हजेरी लावली आहे. मुलांमध्ये तर मोगाची खास क्रेझ पाहायला मिळत आहे. पण एवढ्यावर न थांबता मोगा चक्क गरबा, दांडीयामध्ये पोहचला आहे.
नवरात्र निमित्त राज्यभर दांडिया आणि गरबाचा कार्यक्रम होत आहे. याचेच औचित्य साधून मोगा रविवारी रात्री ताळगाव येथील शंकर देवस्थानात दांडिया आणि गरबा करताना दिसला आहे.
दांडिया सुरू असताना अचानक मोगा आला, आणि एवढेच नाही तर मोगाने उपस्थितांसोबत दांडिया आणि गरबा खेळण्याचा आनंद लुटला. दांडिया खेळल्यानंतर अनेकांना मोगासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मोगाने उपस्थित राहून दांडियाला रंगत आणली म्हणून आयोजकांनी मोगाचे आभार मानले. दरम्यान मोगाने देखील राज्यातील क्रीडा स्पर्धांचा आस्वाद लोकांनी घ्यावा, व स्पर्धा सफल करावी, असे आवाहन यावेळी केले.