मोदींचे भाषण गेले लहान मुलांच्या डोक्यावरून; काहींनी ऐकले अर्धवट
By Admin | Updated: September 6, 2014 01:25 IST2014-09-06T01:21:02+5:302014-09-06T01:25:07+5:30
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदीतील भाषण ऐकण्याची सक्ती पहिली ते दहावीच्या मुलांना करण्याचा निर्णय अंगलट आल्याचे चित्र शुक्रवारी

मोदींचे भाषण गेले लहान मुलांच्या डोक्यावरून; काहींनी ऐकले अर्धवट
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदीतील भाषण ऐकण्याची सक्ती पहिली ते दहावीच्या मुलांना करण्याचा निर्णय अंगलट आल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले. हे भाषण बहुतांश मुलांच्या डोक्यावरून गेल्याचा अनुभव गोव्यात आला. पहिली ते चौथीपर्यंतची मुले तर कंटाळलीच; शिवाय ख्रिस्ती विद्यार्थ्यांना हे हिंदी भाषण ऐकणे ही एकप्रकारे शिक्षाच वाटल्याचेही दिसून आले.
शिक्षण खात्याने फतवा काढल्याने सगळे भागशिक्षणाधिकारी कामाला लागले होते. केंद्रात व गोव्यातही भाजपचे सरकार अधिकारावर आहे. शिवाय, मोदी हे पंतप्रधान असल्याने त्यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याची व्यवस्था तुम्ही करायलाच हवी, असे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी काही भागशिक्षणाधिकारी तसेच अनेक मुख्याध्यापकांना फोन करून सांगितले होते. त्यामुळे सगळे कामाला लागले. मुलांना सकाळपासून सायंकाळपर्यंत शाळेत ठेवण्यात आले. टीव्ही संच, प्रोजेक्टर्स वगैरे आणले गेले आणि शेकडो मुलांसमोर मोदींचे भाषण प्रक्षेपित करण्यात आले. मुले कशीबशी पावणेदोन तास बसली. पहिली ते चौथीपर्यंतची मुले तर प्रचंड कंटाळली. या मुलांना शांत बसवून ठेवण्याकडेच आम्हाला लक्ष द्यावे लागले, असे काही शिक्षकांनी सांगितले. काही विद्यालयांनी तर मोदींचे अर्धे भाषण झाल्यानंतर ‘तुम्ही घरी चला’, असा संदेश मुलांना दिला. मुले
शांत बसेनाशी झाल्याने शिक्षकांचाही नाईलाज झाला. (पान २ वर)