शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सरकारी आग्रहामुळेच खाण कंपन्यांकडून 12.5 रुपये दर : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 9:10 PM

पणजी : खनिज वाहू ट्रकांसाठी साडेबारा रुपये हा दर देखील मिळणार नव्हता. खाण कंपन्या नऊ ते दहा रुपये प्रति किलोमीटर प्रति टनासाठी दर देण्यास तयार होत्या.

पणजी : खनिज वाहू ट्रकांसाठी साडेबारा रुपये हा दर देखील मिळणार नव्हता. खाण कंपन्या नऊ ते दहा रुपये प्रति किलोमीटर प्रति टनासाठी दर देण्यास तयार होत्या. सरकारने आग्रह धरल्यामुळेच ट्रक मालकांना साडेबारा रुपये दर देण्यास खनिज कंपन्या तयार झाल्या, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी येथे सांगितले.लोकमतशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की विविध गावांमधील खनिज वाहतुकीचे प्रश्न मिटले आहेत. जे काही शिल्लक उरले आहेत, ते देखील सोडविले जातील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये खनिजाचे दर सध्या कमी आहेत. खाण कंपन्यांना दर वाढवून देणे परवडत नाही. सरकारने जोर धरल्यामुळे साडेबारा रुपये दर त्यांनी मान्य केला. प्रथम खाण कंपन्यांची त्यासाठी तयारीच नव्हती.मुख्यमंत्री म्हणाले, की विविध खाण कंपन्यांनी सध्या खनिज उत्खनन सुरू केले आहे. सेझा, तिंबले, साळगावकर  कंपन्या उत्खनन करत आहेत. त्यांना खनिज निर्यातीतून जास्त फायदा सध्या मिळू शकत नाही. भविष्यात दर वाढेल असा विचार करून त्यांच्याकडून उत्खनन केले जाते. ट्रक मालकांना किलोमीटरमागे साडेबारा रुपयांपेक्षा जास्त दर देणे कंपन्यांना परवडत नाही. शेवटी खनिज निर्यात तसेच खनिज वाहतूक हा एक धंदा आहे. अमकाच वाहतूक दर द्यावा अशी सक्ती सरकार खाण कंपन्यांवर करू शकत नाही. दरम्यान, वेदांता- सेझा गोवाने सोमवारी एक प्रसिद्धिपत्रक जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.सरकारने खनिज वाहतुकीबाबत ज्या सूचना केल्या होत्या, त्या सूचनांचे पालन आम्ही करत आहोत, असे वेदांताने म्हटले आहे. वेदांता खनिज वाहतुकीबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेत नाही. सरकारने पहिल्या दहा किलोमीटरसाठी प्रति किलोमीटर प्रति टन साडेबारा रुपये दर निश्चित केला. 11 ते 20 किलोमीटरच्या अंतरासाठी प्रति किलोमीटर 12 रुपये व 20 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी प्रति किलोमीटर साडेअकरा रुपये दर निश्चित केला. आम्ही पूर्णपणे याचे पालन केले आहे, असे वेदांताने म्हटले आहे. आम्हाला सर्व घटकांच्या पाठिंब्याने खनिज धंदा सुरू करायचा आहे, असेही वेदांताने म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर