शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

सांतीनेझ येथील 'त्या' वटवृक्षाचे कांपाल येथे स्थलांतर; स्मार्ट सिटी प्रशासन घेणार झाडाची काळजी

By समीर नाईक | Published: April 07, 2024 3:26 PM

सांतीनेझ येथील दोनशे वर्ष जुने वटवृक्ष स्मार्ट सिटी प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री मुळापासून उपटून काढले होते.

समीर नाईक, पणजी-गोवा: सांतीनेझ येथील दोनशे वर्ष जुने वटवृक्ष स्मार्ट सिटी प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री मुळापासून उपटून काढले. आणि नंतर शनिवारी सायंकाळी हे मूळ कांपाल येथील परेड मैदानावर स्थलांतरीत करण्यात आले. सध्या या परेड मैदानावर नवीन फुटबॉल मैदानाचे काम सुरू असून, या कामादरम्यान या वटवृक्षाची काळजी घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

 शुक्रवारीपासून सदर वटवृक्ष कापण्यात येत असल्याने सांतीनेझ येथे तणावाचे वातावरण झाले होते. अनेक पर्यावरणप्रेमी आणि गोवा ग्रीन ब्रिगेडचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहत प्रशासनाच्या या कृत्याचे निषेध केला. काहीनी तर येथे नारळ फोडून प्रशासनाविरोधात सार्वजनिक गाऱ्हाणे देखील घातले होते. पण तरीही हे झाड कापून नंतर केवळ वटवृक्षाचे मूळ कांपाल येथे स्थलांतरीत करण्यात आले. 

रविवारी सकाळपर्यंत या वटवृक्षाचे मूळ स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया स्मार्ट सिटी प्रशासनाने पणजी महानगरपालिकेच्या सहाय्याने पूर्ण केली. शनिवारी या वटवृक्षाचे मूळ जमनीत घालण्यासाठी आवश्यक मोठा गड्डा देखील खोदण्यात आला होता. नंतर क्रेनच्या सहाय्याने उपळून आणण्यात आलेले हे वटवृक्षाचे मूळ या गड्ड्यात घालण्यात आले. 

सध्यातरी हे मूळ कांपाल येथे स्थलांतरित करण्यात आले असले तरी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रात्रीची फुले किंवा पाने तोडण्यास मनाई असताना एवढे मोठे वटवृक्ष कसे तोडण्यात आले?, स्थलांतरीत करण्यासाठी संपूर्ण वटवृक्षाच्या संपूर्ण फांद्या नष्ट करण्यात आल्या आणि केवळ मूळ नेऊन दुसरीकडे लावण्यात आले, त्यामुळे सदर वटवृक्ष यातून जगणार का? स्थलांतरीत केलेला वटवृक्ष या रखरखत्या उन्हात कसे जिवंत राहणार? या वटवृक्षाची काळजी घेण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी